Jump to content

शामराव ओक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

श्यामराव नीळकंठ ओक (२७ जानेवारी, १९०७ - ??) हे एक मराठी लेखक होते. त्यांनी अनेक विनोदी आणि अन्य पुस्तके लिहिली. ते एका जाहिरातसंस्थेत काम करीत असत.

श्यामराव ओक हे पी.जी. वुडहाऊस, डेमन रनयॉन इत्यादी विनोदी कथाकारांचा चपखल मराठी अनुवाद करण्यात माहीर होते.

आनंद अंतरकरांनी 'रत्नकीळ' या पुस्तकात, शामराव ओक हे व्यक्तिचित्र रेखाटताना, त्यांना शामराई नावाच्या सुंदर बनाची उपमा दिली आहे.

शामराव ओक यांची पुस्तके

[संपादन]
  • अखिल भारतीय पीडित पति-मेळा (कथा, दीपावली २०००)
  • अधूरी इकसठवीं सालगिरह (मूळ मराठी)
  • गड्या अपुला गाव बरा (नाटक, इ.स. १९५९) (शेक्सपियरच्या 'ए कॉमेडी ऑफ एरर्स'चे मराठी रूपांतर)
  • चोरबाजारांतील चिजा : तीस तऱ्हेवाईक गोष्टी (कथासंग्रह)
  • चौकोनी कुटुंब (कादंबरी?)
  • जल जिज्ञासा (माहितीपर)
  • धोत्र्याचे कळे (कथासंग्रह)
  • परिहास ( चोरबाजारांतील चिजा : तीस तऱ्हेवाईक गोष्टी)
  • बारानिशी
  • मालगाडी (कादंबरी)
  • विनोद बत्तीशी, (कथासंग्रह)
  • शामराई (निबंधसंग्रह)
  • भिडस्त माणूस (Oliver Goldsmith च्या A good natured man चे भाषांतर)