शाई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
जर्मनी येथील शाई

शाई म्हणजे पाण्यापेक्षा घट्ट असलेला रंग देणारा द्रवपदार्थ होय. हा वापरून लिखण किंवा प्रतिमा चितारल्या जाऊ शकतात. पेन अथवा कुंचला वापरून शाई द्वारे लिहिले किंवा चित्र काढले जाते. शाई वापरून छपाई केली जाते.

रचना[संपादन]

शाई मध्ये रंगद्रव्य आणि त्या रंगाला वाहून देणारे माध्यम व त्या दोघांना एकत्र ठेवणारे अजून एक द्रव्य अशी रचना असते.

फौनटन पेन लिखित शाईचे मोठे केलेले चित्र

इतिहास[संपादन]

प्राचीन चीन मध्ये लिखित स्वरूपात शाईचा उपयोग आढळतो. तसेच भारतात शाईचा उपयोग तसेच निर्यात केल्याचे पुरावे आढळतात. भारत सुमारे १९२० पर्यंत शाई निर्मिती व निर्यात करणारा जगातील प्रमुख देश होता. नंतर जर्मनी या देशाने हे तंत्र शिकुन घेतले आणि निर्यात करायला सुरुवात केली.[१]

प्रकार[संपादन]

  • काजळाची शाई - दिव्या भोवतीचे काजळ (कार्बन) व एरंडाचे तेल हे वापरून ही शाई तयार होते.

छपाईची शाई, लिखाणाची शाई असे शाईचे प्रकार विकसित झाले आहेत. त्वचेवर लावण्यासाठी असलेली शाई ‘म्हैसूर शाई’ म्हणून ओळखले जाते. निवडणुकीत ही वापरली जाते. ही शाई कर्नाटकातील म्हैसूर येथे तयार होऊन देशात व विदेशात या शाईचा पुरवठा केला जातो. कर्नाटक सरकारच्या अखत्यारीतील म्हैसूर पेंटस् वॉर्निश लिमिटेड (एमपीव्हीएल) म्हैसूर या कंपनीत शाई तयार होते. [२][३]

  • लेझर प्रिंटर शाई - ही भुकटी स्वरूपात असते.
  • इंक जेट शाई - ही द्रव्य स्वरूपात असते.

हे सुद्धा पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]