शांताराम नाईक
Appearance
भारतीय राजकारणी | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | एप्रिल १२, इ.स. १९४६ कंकोळी | ||
---|---|---|---|
मृत्यू तारीख | जून ९, इ.स. २०१८ मडगांव | ||
नागरिकत्व |
| ||
व्यवसाय | |||
राजकीय पक्षाचा सभासद | |||
पद |
| ||
| |||
शांताराम लक्ष्मण नाईक (१२ एप्रिल १९४६ - ९ जून २०१८) हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे राजकारणी आणि राज्यसभेत गोव्याचे प्रतिनिधित्व करणारे खासदार होते. ते गोवा प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि राज्यसभेतील काँग्रेसचे व्हिप होते.[१][२]
१९८४ च्या निवडणुकीत त्यांनी उत्तर गोवा मतदारसंघातून विजय मिळवला व ८ व्या लोकसभेवर निवडून आले.[३] लोकसभा सदस्य म्हणून त्यांनी ८ व्या लोकसभेत सर्वाधिक खाजगी सदस्य विधेयके सादर केली. गोव्याला राज्याचा दर्जा मिळावा या मागणीचाही त्यांनी पाठपुरावा केला.
नाईक यांनी २००५ ते २०१७ दोन वेळा राज्यसभेत गोव्याचे प्रतिनिधित्व केले.
९ जून २०१८ रोजी मडगाव येथे हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.[४][५][६]
संदर्भ
[संपादन]- ^ "Indian National Congress". 25 July 2017 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 25 July 2017 रोजी पाहिले.
- ^ "Biased Editorial approach".[permanent dead link]
- ^ "1984 India General (8th Lok Sabha) Elections Results". www.elections.in.
- ^ "Ex-Goa Congress Chief Shantaram Naik dies". www.aninews.in (इंग्रजी भाषेत). 2018-06-09 रोजी पाहिले.
- ^ NDTV (9 June 2018). "Former Goa Congress Chief Shantaram Naik Dies Of Heart Attack At 72". 12 May 2024 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 12 May 2024 रोजी पाहिले.
- ^ The Hindu (9 June 2018). "Veteran Congress leader Shantaram Naik dead" (इंग्रजी भाषेत). 12 May 2024 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 12 May 2024 रोजी पाहिले.