शरद मराठे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

शरद श्रीपाद मराठे (? - सप्टेंबर २८, २००८; पुणे, भारत) हे मराठी अर्थतज्ज्ञ होते. ते आयडीबीआय बँकेचे पहिले संचालक होते.

जीवन[संपादन]

मराठे 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्सेस' या संस्थेतून अर्थशास्त्राचे पदवीधर झाले. त्यांनी भारतीय केंद्र शासनाचे आर्थिक सल्लागार म्हणून, तसेच काही काळ केंद्रीय उद्योग खात्याचे माजी सचिव म्हणून काम सांभाळले. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीवर त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले.