शकुंतला फडणीस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

शकुंतला फडणीस (माहेरच्या शकुंतला बापट) या एक मराठी लेखक आणि बालसाहित्यिक आहेत. शकुंतला फडणीस यांची २०१६ सालापर्यंत २८ पुस्तके प्रकाशित झाली. त्यापैकी तीन पुस्तकांना राज्यस्तरीय व चार पुस्तकांना खासगी पुरस्कार मिळाले आहेत..

कौटुंबिक माहिती[संपादन]

त्यांचे बालपण अमरावतीत गेले. शि.द. फडणीस या व्यंगचित्रकारांच्या त्या पत्‍नी आहेत. त्यांना हिमानी गोगटे आणि रूपाली देवधर नावाच्या दोन मुली, आणि हिमानी, धव, चिन्मय आणि असीम नावाची नातवंडे आहेत.

पुस्तके[संपादन]

 • आजीचा धडा आणि इतर कथा
 • आत कोण आहे? (बालनाट्य)
 • कौतुकाचा गंगाराम
 • गुदगुल्या हसर्‍या अन्‌ बोचर्‍या
 • चमचम घागर
 • पत्राचा प्रवास आणि इतर कथा
 • पैज जिंकली छोट्यानं आणि इतर कथा
 • फोटोवर टिच्चून
 • माझ्या सासूबाई ( प्राथमिक शिक्षक मित्र’च्या अंकातील लेख)
 • मी आणि हसरी गॅलरी
 • व्यंगचित्रांकित साहित्यसंभार (लोकसत्ताच्या २०१३ सालच्या दिवाळी अंकातला लेख)
 • शुभंकरोतीची पन्नास वर्षे (आत्मकथन)
 • संवाद हास्यचित्रांशी
 • सांग ना ग आई आणि गोष्टी
 • सोन्यासारखी संधी
 • होल्डॉल