शंकर सखाराम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Imbox content.png
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. संदर्भ कसे निवडावेत याची माहिती येथे मिळेल तर संदर्भ कसे जोडायचे याची माहिती आपल्याला येथे मिळेल.

शंकर सखाराम पाटील (जन्म : इ.स. १९५१; मृत्यू : ऑक्टोबर २०१२) हे मराठीतले एक भाषाभ्यासक लेखक व कवी होते. मराठीच्या बोलीभाषांतील अनेक ग्रामीण शब्दांची व्युत्पत्ती आणि अर्थ त्यांनी उलगडून दाखवला आहे.

शंकर सखाराम यांनी महाविद्यालात असल्यापासून कथालेखनाला सुरुवात केली. त्यांना कोकणातील ग्रामीण कथालेखक समजले जाते. त्यांनी आपल्या कवितेतून शेतकऱ्यांच्या दुःखाचे वर्णन केले आहे.

शंकर सखाराम हे मुंबईतील चेंबूरच्या आचार्य मराठे महाविद्यालयात मराठी विषयाचे प्राध्यापक होते. २०११ साली ते सेवानिवृत्त झाले होते. त्यांनी कथा, कादंबऱ्यांसह विविध वृत्तपत्रांत स्तंभलेखन असे विपुल लेखन केले होते.

पुस्तके[संपादन]

 • आपणांस माहीत असावे असे (सामान्य ज्ञान)
 • एसईझेड (सेझ)
 • कामगार
 • कोजागिरी (बालसाहित्य, कथासंग्रह)
 • कोसलन (कादंबरी)
 • गावदरणी (ललित)
 • घरपरसू (ललित)
 • घुगाट (कथासंग्रह)
 • झोंज (कथासंग्रह)
 • बखर सदाशिव वाशीकरची (कादंबरी)
 • बलुतेदार (माहिती आणि शब्दचित्रे)
 • बोध गोष्टी (ललित)
 • भूक (कादंबरी)
 • माया (कादंबरी)
 • मेल (कथासंग्रह)
 • लघुउद्योजक
 • शब्दानुबंध
 • शिकार (कथासंग्रह)
 • शेतकरी राजा
 • सायादान (कादंबरी)
 • सूर मातीचा (लेखसंग्रह)
 • सोनचाफा (कादंबरी)
 • हरवलेली वस्तुसंस्कृती

पुरस्कार[संपादन]

 • प्रा० ना.गो. कालेलकर यांच्या नावाचा मराठी अभ्यास परिषद पुरस्कार. याआधी हा पुरस्कार 'महाबँक भाषाविषयक लेखन पुरस्कार' या नावाने ओळखला जात होता.
 • महाराष्ट्र राज्य पुरस्कार, जनसारस्वत सन्मान, रोहमारे ग्रामीण साहित्य पुरस्कार, कवी केशवसुत पुरस्कार वगैरे.