शंकरबापू आपेगावकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(शंकर शिंदे या पानावरून पुनर्निर्देशित)

शंकरबापू आपेगावकर (इ.स. १९११ - ९ जानेवारी, इ.स. २००४) हे राष्ट्रीय ख्यातीचे पखवाजवादक आहेत.[१] हे वारकरी प्रकारचे पखवाजवादन करीत[२] त्यांना १९८६मध्ये पद्मश्री पुरस्कार दिला गेला[३]

यांचे मूळ नाव शंकर शिंदे होते. यांचा मुलगा उद्धवबापू आपेगावकर हाही पखवाजवादक आहे.[२]

शंकरबापू आपेगावकर यांचा जन्म अंबाजोगाई तालुक्यातल्या आपेगाव या छोट्या गावात इ.स. १९११मध्ये झाला. लहानपणापासूनच त्यांना पखवाज वाजवायचा नाद होता.

शंकरबापू आपेगावकर यांना मिळालेले पुरस्कार आणि सन्मान[संपादन]

  • पद्मश्री (१९८६)
  • मराठवाडा संगीत कला अकादमीकडून गौरव (१९९०)
  • मुंबईच्या स्वरसाधना समितीतर्फे सन्मान
  1. ^ "मोंबूवरील लघुचरित्र". 2006. August 18, 2015 रोजी पाहिले.[permanent dead link]
  2. ^ a b "The Udhav शिंदे Trio". 2015. August 18, 2015 रोजी पाहिले.
  3. ^ "पद्म पुरस्कार" (PDF) (इंग्लिश भाषेत). 2015. Archived from the original (PDF) on 2015-10-15. July 21, 2015 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)