शंकर भाऊ साठे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


(आॅक्टोबर 26, इ.स.1925 मार्च 15, 1996)

जन्म आॅक्टोबर 26, इ.स.1925

वाटेगाव, तालुका वाळवा, जि.सांगली

मृत्यू - मार्च 15, इ.स.1996

राष्ट्रीयत्व - भारतीय

नागरिकत्व - भारतीय

    शंकर भाऊ साठे (आॅक्टो. 26, इ.स.1925-मार्च 15, इ.स.1996) हे मराठी साहित्यातील एक महत्त्वाचे कादंबरीकार आणि शाहीर असून त्यांच्या बारा कादंब-या आणि एक चरित्र प्रसिद्ध आहे. ख्यातनाम लोकशाहीर आणि साहित्यिक अण्णा भाऊ साठे यांचे ते धाकटे बंधू होत. ‘माझा भाऊ अण्णाभाऊ’ या पुस्तकाद्वारे 1 आॅगस्ट 1980 रोजी अण्णा भाऊ साठे यांचे चरित्र पहिल्यांदाच मराठीत आणण्याचे श्रेय शंकर भाऊ साठे यांनाच दिले जाते. बारा कादंब-या, एक चरित्र आणि काही कथा तसेच लावण्या लिहिणारे प्रतिभासंपन्न लेखक शंकर भाऊ साठे यांची फारसी दखल मात्र मराठी साहित्य समीक्षकांनी घेतलेली नाही. संयुक्त महाराष्ट्र लढ्यात शंकर भाऊ साठे यांचे लक्षणीय योगदान असून, ‘लालबावटा कलापथक’ आणि अण्णा भाऊ साठे कलापथकाच्या माध्यमातून शंकर भाऊ साठे यांनी केलेले प्रबोधनाचे कार्य अत्यंत स्पृहणीय स्वरूपाचे आहे. उभी हयात त्यांनी लेखन आणि शाहिरीच्या माध्यमातून जनसेवेसाठी वाहिली. भारतीय स्वातंन्न्यलढा, संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन आणि कामगारांची चळवळ ही शंकर भाऊ साठे यांच्या आयुष्यातली तीन महत्त्वाची आंदोलने. अण्णा भाऊ साठे, अमरशेख आणि द.ना. गव्हाणकर यांच्याबरोबर शेतकरी-कामकरी जनतेचे प्रबोधन करण्यासाठी शंकर भाऊ साठे महाराष्ट्र आणि भारतभर फिरले. महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज आणि डाॅ.बाबासाहेब आंबेडकर, अण्णा भाऊ साठे यांच्या विचार-कार्याचा प्रभाव शंकरभाऊंवर होता, तसाच कार्ल माक्र्सचा प्रभावही शंकर भाऊ साठे यांच्यावर सुरुवातीच्या काळात होता. माक्र्स-आंबेडकरी विचार प्रेरणेतूनच त्यांनी दर्जेदार मराठी कादंबरीलेखन केले.

जीवनकार्य

    वाटेगाव ता.वाळवा जि.सांगली येथे 26 आॅक्टोबर 1925 रोजी गावाबाहेर निवडुंगांनी वेढलेल्या एका मांगवाड्यात शंकर भाऊ साठे यांचा जन्म झाला. त्यांचे आजोबा सिद्धोजी राघोजी साठे हे मुंबईत बांधकामाचे कंत्राटदार होते. गावाकडे त्यांनी 54 एकर जमीन खरेदी केली होती. मात्र ती जमीन नंतर टाकवे गावच्या एका गावगुंडाने ताब्यात घेतली म्हणून या कुटुंबाचे सिद्धोजींच्या मृत्यूनंतर प्रचंड हाल झाले. सिद्धोजींना एकच मुलगा होता, तो म्हणजेच भाऊराव. भाऊराव आणि वालुबाई या दांपत्याच्या पोटी शंकर भाऊ साठे यांचा जन्म झाला. भाऊराव सिद्धोजी साठे हे मुंबईत इंग्रज अधिका-यांच्या बंगल्यातील बगिच्यांमध्ये काम करीत असत. आपल्या मुलांनी शिक्षण घ्यावे, मोठे व्हावे असे त्यांना वाटे. म्हणून त्यांनी मोठा मुलगा तुकाराम (अण्णा भाऊ साठे) याला गावातील शाळेत घातले. मात्र दीड दिवसातच तुकारामाची शाळा सुटली तेव्हा भाऊरावांनी आपल्या कुटुंबाला मुंबईत घेऊन जाण्याचा विचार केला. मोठी बहीण भागुबाई, मोठे बंधू तुकाराम ऊर्फ अण्णाभाऊ आणि धाकटी बहीण जाईबाई यांच्यासह शंकरभाऊंनी वाटेगाव ते पुणे असा पायी प्रवास केला. पुढे ते मुंबईत पोहचले. मुंबईतील शाळेत शंकर भाऊ साठे यांना दाखल केले. मात्र पंधरा दिवसातच त्यांनी शाळा सोडली. अण्णा भाऊ साठे हे मुंबईत गिरणी कामगार बनले. तेव्हा शंकर भाऊ साठे यांनाही मुंबईतील करीमभाई मिलमध्ये नोकरी लागली. शंकर भाऊ साठे ‘काॅम्रेड’ बनले. ‘लालबावटा’ कलापथकातील शाहीर बनले. जनाबाईंबरोबर शंकर भाऊ साठे यांचे वैवाहिक जीवन सुरू झाले. जनाबाई आणि शंकर भाऊ साठे या दांपत्याला एकूण सहा अपत्ये झाली. आशा, उषा या दोन मुली आणि त्यांचा एकुलता एक मुलगा संजय हे तिन्ही मृत पावले असून, सध्या चित्रा ही मुलगी सांगली जिल्ह्यातील विटा येथे राहते, तर रेखा आणि तिची बहीण या मुंबईत राहतात. शंकर भाऊ साठे यांच्या कनिष्ठ भगिनी जाईबाई तुकाराम भगत या मुंबईतील घाटकोपर येथे राहतात. शंकर भाऊ साठे यांच्या कनिष्ठ भगिनी जाईबाई तुकाराम भगत या मुंबईतील घाटकोपर येथे राहतात. शंकर भाऊ साठे यांचे नातू सचिन संजय साठे हे बीड येथील बलभीम महाविद्यालयात नोकरी करतात. शंकर भाऊ साठे यांनी आपले ज्येष्ठ बंधू अण्णा भाऊ साठे यांच्यापासून प्रेरणा घेऊन आयुष्याच्या उत्तरार्धात साहित्यलेखनाला सुरुवात केली. अण्णा भाऊ साठे यांच्या निर्वाणानंतर शंकर भाऊ साठे यांचे फार हाल झाले. पत्नी जनाबाई यांचे शेवटच्या बाळांतपणातच निधन झाले. पुढे एकुलता एक मुलगा संजय यांचेही अपघाती निधन झाले. सर्व दुःख पचवून शंकर भाऊ साठे यांनी अखेरचा श्वास घेईपर्यंत अत्यंत निष्ठेने लेखन केले. समाजात जाऊन ते शाहिरी गात, भाषणे देत. शंकरभाऊ हे जीवनाच्या रणांगणावर लढणारे लेखक होते. त्यांनी एकूण 15 कांदब-या लिहिल्या त्यापैकी 12 प्रकाशित असून तीन कादंब-या अप्रकाशित आहेत. स्वातंन्न्यासाठी लढणा-या या कायकत्र्या लेखकाने वास्तववादी कादंब-या लिहून मराठी साहित्य समृद्ध केले आहे. सत्यासाठी लढणारे नायक आणि शीलासाठी लढणा-या नायिका शंकर भाऊ साठे यांनी मराठी साहित्यात आणल्या. शंकर भाऊ साठे हे मराठीतील थोर वास्तववादी कादंबरीकार आणि उत्कृष्ट चरित्रकार आहेत. असा निष्कर्ष त्यांच्या जीवन आणि साहित्यावर पीएच.डी. करणारे संशोधक डाॅ.मारोती कसाब यांनी नोंदविला आहे.

शंकर भाऊ साठे यांची वाड्मय सूची

अ.    चरित्र

    शीर्षक                आवृत्ती                प्रकाशन संस्था

1.    माझा भाऊ अण्णाभाऊ        पहिली                सुगावा प्रकाशन,

                    1 आॅगस्ट 1980            पुणे

                    दुसरी                विद्यार्थी प्रकाशन,

                    1 मार्च 1984            पुणे

                    तिसरी                विद्यार्थी प्रकाशन,

                    एप्रिल 1990            पुणे            

ब.    कादंबरी

    शीर्षक                आवृत्ती                प्रकाशन संस्था

1.    एकच काडतूस            प्रथम                विद्यार्थी प्रकाशन,

                    1 मे 1984            178/ब, पर्वती, पुणे-9

2.    सूड                प्रथम                ‘‘-’’

                    22 आॅक्टो. 1985

3.    घमांडी                प्रथम                ‘‘-’’

                    12 जून 1986

4.    काळा ओढा            प्रथम                ‘‘-’’

                    14 जाने. 1987

5.    सगुणा                प्रथम                ‘‘-’’

                    26 फेब्रु.1987            

6.    हंबीरा                प्रथम                ‘‘-’’

                    6 मार्च 1989        

7.    जग                प्रथम                ‘‘-’’

                    6 मार्च 1989

8.    सावळा                प्रथम                ‘‘-’’

                    6 मार्च 1989            

9.    लखू                प्रथम                 ‘‘-’’

                    16 मे 1991

10.    बायडी                प्रथम                ‘‘-’’

                    16 मे 1991

11.    बाजी                प्रथम                ‘‘-’’

                    15 जाने. 1992

12.    सुगंधा                16 मे 1991            ‘‘-’’

क.    कथा

1.    कुराडीचा घाव            आॅक्टो. 1978            सा.बहुजन समाज

                                    दिवाळी अंक, कोल्हापूर

2.    आम्हीही माणसे आहोत                    अप्रकाशित    

3.    राणोजी                                ‘‘-’’

ड.    निवडणूक प्रचारगीत                    

1.    विसरु नका            1978                अप्रकाशित        

इ.    स्फूट वैचारिक लेख

1.    ‘शाहीर आणि लोकशाहीर’ आॅगस्ट 1989 अण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त प्रकाशित विचारक्रांती स्मरणिका, संपा.दिगंबर घंटेवाड, नांदेड

संदर्भ सूची

1.    साठे शंकर भाऊ, ‘माझा भाऊ अण्णाभाऊ’, विद्यार्थी प्रकाशन, 178/ब, पर्वती, पुणे-9

    द्वि.आ.    1 मे 1984

2.    गायकवाड शरद राजाराम, ‘शंकरभाऊ साठे यांच्या ‘सावळा’ व ‘घमांडी’ या

कादंब-यांचा अभ्यास’, हा शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांना एम.फिल साठी सादर केलेला शोधप्रबंध (1996 ते 2000)

3.    कसाब मारोती दशरथ, ‘शंकरभाऊ: व्यक्तित्व आणि वाड्मयीन कर्तृत्व’, या विषयावर

    स्वा.रा.ती.म. विद्यापीठ, नांदेड यांना पीएच.डी. पदवीसाठी सादर केलेला शोधप्रबंध

    (2008 ते 2014)     

4.    आवाड एकनाथ, ‘जग बदल घालुनि घाव’, समकालीन प्रकाशन, 8 अमीत काॅम्प्लेक्स

    477, सदाशिव पेठ, पुणे-30, प.आ. 2011

प्रा.डाॅ.मारोती कसाब

                                      मराठी विभाग                                         शिवाजी महाविद्यालय,उदगीर जि.लातूर