शंकर बडे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

शंकर ऊर्फ काका बडे (३ मार्च, इ.स. १९४७:बोरीअरब, दारव्हा तालुका - १ सप्टेंबर, इ.स. २०१६:यवतमाळ, महाराष्ट्र) हे मराठी कवी होते. हे यवतमाळ येथे राहत. त्यांनी वर्‍हाडी बोलीभाषेतून कविता लिहिल्या.

शंकर बडे हे वर्‍हाडी कविता आणि किस्स्यांचे तसेच एकपात्री कार्यक्रम करत. वर्‍हाडच्या ग्रामीण जीवनातील अनुभव त्यांनी आपल्या बॅरिस्टर गुलब्या या एकपात्री प्रयोगातून साकारले. महाराष्ट्रात त्या एकपात्रीचे तीनशेवर प्रयोग झाले.

आकाशवाणी-दूरदर्शनसाठी आणि वृत्तपत्रांतून व दिवाळी अंकांतून त्यांनी लेखन केले.

भाग्योदय कला मंडळाच्या शिवरंजनी ऑर्केस्ट्रात त्यांनी निवेदक म्हणून काम केले होते.

काही कविता[संपादन]

  • आम्ही असे दिवाणे आम्हास नाव नाही आम्ही घरोघरी अन् आम्हास गाव नाही ...
  • पावसानं इचीबहीन कहरच केला नं नागो बुढा काल वाहूनच गेला

कवितासंग्रह[संपादन]

  • अस्सा वर्‍हाडी माणूस
  • मुगूट

सन्मान[संपादन]

  • आर्णी येथे २१-२३ फेब्रुवारी २०१४ या काळात झालेल्या ६३व्या [विदर्भ साहित्य संमेलन|विदर्भ साहित्य संमलनाचे]] अध्यक्षपद