शं.ना. नवलगुंदकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(शंकर नागेश नवलगुंदकर या पानावरून पुनर्निर्देशित)

डॉ. शंकर नागेश नवलगुंदकर (२७ सप्टेंबर, १९३५:संगमनेर, महाराष्ट्र - ) हे पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू आहेत.

कौटुंबिक माहिती आणि शिक्षण[संपादन]

यांचे मूळ गाव संगमनेर असून त्यांचे वडील तेथे संस्कृतचे शिक्षक होते. नवलगुंदकरांचे शालेय शिक्षण संगमनेरच्या पेटिट हायस्कूलमध्ये आणि कॉलेज शिक्षण नाशिकच्या एचपीटी महाविद्यालयामध्ये झाले. महाविद्यालयातील प्राध्यापकांनी सुचवल्यामुळे संस्कृतऐवजी अर्थशास्त्र विषय घेऊन नवलगुंदकरांनी पदवी मिळवली. त्यांनी स्‍वातंत्र्यवीर सावरकर या विषयावर पीएच.डी.ची पदवी मिळवली.

१९५८ च्या सुमारास नवलगुंदकर पुण्यात आले आणि सराफ विद्यालय (आत्ताचे भारत हायस्कूल) येथे इंग्लिश आणि गणिताचे शिक्षक म्हणून रुजू झाले. त्यानंतर शाहू महाविद्यालय, गरवारे महाविद्यालय, मॉडर्न महाविद्यालय आणि पुणे विद्यापीठात त्यांनी अध्यापन केले. पुणे विद्यापीठाचे कुलगुरू झाल्यावरही ते टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ आणि पुणे विद्यापीठात अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र हे विषय शिकवीत. नवलगुंदकर २०१६पासून संगमनेरच्या शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष आहेत.

लेखन[संपादन]

नवलगुंदकरांनी राज्यशास्त्र व अर्थशास्त्राविषयीच्या अनेक पाठ्यपुस्तकांचे लेखन केले. आधुनिक भारतीय राजकीय विचारवंत हे त्यांचे पहिले पुस्तक होते. सुलभ राज्यशास्त्र (भारतीय शासनसंस्था) पुस्तक हे त्यांनी बाराव्या इयत्ते करिता लिहिले.

अन्य पुस्तके[संपादन]

  • आधुनिक भारतीय राजकीय विचारवंत
  • आनंद तरंग ( विनोद आणि संस्कार) भाग १, २, ३.
  • पसायदान : हिंदुत्वाचा जाहीरनामा
  • वि. दा. सावरकर
  • स्वातंत्र्यवीर सावरकर विचारविश्व (१९९९)