व्हेजिटेरियन सोसायटी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
इंग्लंडमधील शाकाहारी सभेचा शिक्का असणारे एक खाद्य उत्पादन.

व्हेजिटेरियन सोसायटी (शाकाहारी सभा) ही इंग्लंडमधील १८४७ साली स्थापन झालेली एक संस्था आहे. इंग्लंडमध्ये शाकाहारास उत्तेजन देणे हे या संस्थेचे उद्दिष्ट आहे. शाकाहारी सभेची स्थापना इंग्लंडमधील रॅम्सगेट गावी झाली. इंग्लंडमधील शाकाहारी खाद्य उत्पादनांची चाचणी करून त्यांना शुद्ध शाकाहारी असल्याची मान्यता देणे हे या सभेचे प्रमुख काम आहे. त्याचबरोबर गावोगावी कार्यक्रम करणे, लोकांना शाकाहाराचे महत्त्व पटवून देणे, दूरचित्रवाणीवर कार्यक्रम सादर करणे, व खाद्य उद्योगातील भ्रष्टाचाराविरुद्ध लढा देणे हे कामदेखील ही शाकाहारी सभा करते. या संस्थेने शाकाहारी खाद्यपदार्थांतून जिलेटिन आणि प्राणिजन्य रेनेट दूर करण्यासाठी प्रयत्‍न केले.

महात्मा गांधी हे त्यांच्या इंग्लंडमधील वास्तव्यात शाकाहारी सभेचे सदस्य होते.