व्ही.एन. मयेकर
व्ही.एन. मयेकर हे हिंदी, मराठी चित्रपटांचे संकलक आणि मराठी चित्रपट-दिग्दर्शक आहेत.
इ.स. १९७१ सालापासून ते मुंबईच्या चित्रपटसृष्टीत काम करीत आहेत. सुरुवातीला ते चित्रपट संकलक जी.जी. मयेकर यांचे साहाय्यक होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली व्ही.एन मयेकर यांनी चित्रपट संकलनाचे धडे गिरवले. त्यांनी संकलित केलेला पहिला चित्रपट म्हणजे बी.आर. चोप्रा फिल्म्सचा ‘छोटी सी बात’ हा चित्रपट होय. त्याचे दिग्दर्शक बासू चटर्जी होते. हा चित्रपट हिट झाला, त्यामुळे मयेकरांचे नाव सर्वतोमुखी झाले.
त्यांनी शंभरहून अधिक चित्रपट केले असून त्यांच्या ‘घातक’ व ‘घायल’ या चित्रपटांना फिल्मफेर पुरस्कार तर ‘लिजंड ऑफ भगत सिंग’ या चित्रपटाला झी पुरस्कार मिळाला. मयेकर यांचे दामिनी, अस्तित्त्व, पुकार, विवाह, शौकीन, हथियार, अंदाज अपना अपना, फिदा, अपने पराये, पिता, खाकी हे चित्रपट सर्वाच्या लक्षात राहिले. त्यांनी ‘तो बात पक्की’ या केदार शिंदे यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटाचे संकलन केले. त्या चित्रपटातील त्यांचे काम पाहून त्यांना केदार यांनी ‘श्रीमंत दामोदरपंत’चे कामही दिले. मयेकर यांनी प्रत्येक चित्रपटाच्या संकलनात त्यांनी वेगळा ठसा उमटवला. बासू चटर्जी, राजकुमार संतोषी, सूरज बडजात्या, महेश मांजरेकर, राहुल रवैल या दिग्दर्शकांबरोबर त्यांना बराच अनुभवही मिळालेला आहे.
मयेकर यांनी चित्रपटांचे संकलन करताना कथाविषयावर सतत लक्ष केंद्रित केले. आणि काळानुसार संकलनाच्या तंत्रज्ञानात होत गेलेले बदल त्यांनी आपलेसे केले. संकलनाचे काम संगणकावर सुरू झाल्यानंतर भल्या भल्या ज्येष्ठ संकलकांनी काम करणे सोडून दिले होते. मयेकर यांनी स्वतःच संगणकावर शिकून ‘मुव्ही लॅप’, ‘फिल्म बॅक’ आणि ‘अॅव्हिड’ असा संकलनाचा बदलता प्रवासही आत्मसात केला आणि आपले काम सुरूच ठेवले.
व्ही.एन. मयेकर यांनी नितीश भारद्वाज, वर्षां उसगावकर, प्रशांत दामले यांच्याबरोबर ‘पसंत आहे मुलगी’ हा चित्रपट दिग्दर्शित केला. त्यानंतर त्यांनी ‘जन्मदाता’, ‘मी तुझी तुझीच रे’ या चित्रपटांचे दिग्दर्शन केले.
दिग्दर्शन केलेले चित्रपट
[संपादन]- जन्मदाता
- पसंत आहे मुलगी (सहदिग्दर्शक - नितीश भारद्वाज, वर्षां उसगावकर, प्रशांत दामले)
- मी तुझी तुझीच रे
मयेकरांचे संकलन असलेले हिंदी-मराठी चित्रपट
[संपादन]
|
|
|
मयेकर यांना मिळालेले पुरस्कार
[संपादन]- 'वास्तव'च्या उत्कृ्ष्ट संकलनासाठी आयफा पुरस्कार (२०००)
- 'घातक'च्या उत्कृ्ष्ट संकलनासाठी फिल्मफेअर पुरस्कार (१९९७)
- 'घायल'च्या उत्कृ्ष्ट संकलनासाठी फिल्मफेअर पुरस्कार
- ‘लिजंड ऑफ भगत सिंग’ या चित्रपटाला झी पुरस्कार
- राज्य शासनाचा चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार (२०१६)