व्हाइटहॉल
व्हाइटहॉल हा इंग्लंडच्या लंडन शहराच्या मध्यवर्ती भागातील वेस्टमिन्स्टर शहरात असलेला एक रस्ता आणि परिसर आहे. हा रस्ता ट्रॅफल्गार स्क्वेर ते चेल्सी पर्यंतच्या ए३२१२ रस्त्याचा सुरुवातीचा भाग आहे. ट्रॅफलगर स्क्वेरपासून पार्लमेंट स्क्वेरकडे दक्षिणेकडे जाणारा हा मुख्य मार्ग आहे. हा रस्ता युनायटेड किंग्डम सरकारचे केंद्र म्हणून ओळखला जातो. या भागात संरक्षण मंत्रालय, हॉर्स गार्ड्स आणि कॅबिनेट कार्यालयासह अनेक सरकारी विभाग आणि मंत्रालये आहेत. परिणामी, व्हाइटहॉल हे नाव ब्रिटीश नागरी सेवा आणि सरकारचे पर्यायी नाव म्हणून वापरले जाते.
या परिसरात पूर्वी व्हाईटहॉल राजवाडा होता. मध्ये आगीत नष्ट होण्यापूर्वी हा राजवाडा आठव्या हेन्रीपासून ते तिसऱ्या विल्यम पर्यंतचे शाही निवासस्थान होते. आता त्यातील फक्त मेजवानीघर शिल्लक आहे. त्यावेळी व्हाईटहॉल हा मूळतः एक रुंद रस्ता होता जो राजवाड्याच्या दरवाजांकडे नेत होता; 18व्या शतकात राजवाड्याच्या नाशानंतर दक्षिणेकडे जाणारा मार्ग रुंद करण्यात आला आणि या भागात मोठ्या प्रमाणात सरकारी कार्यालयांसाठी पुनर्बांधणी करण्यात आली.
सरकारी इमारतींप्रमाणेच या रस्त्या वर अनेक स्मारके आणि पुतळे आहेत.