Jump to content

व्याचेस्लाव्ह मोलोतोव्ह

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(व्याचेस्लाव मोलोटोव्ह या पानावरून पुनर्निर्देशित)
व्याचेस्लाव्ह मोलोतोव्ह

सोव्हियेत संघ सोव्हिएत संघाचे प्रधानमंत्री
कार्यकाळ
१९ डिसेंबर १९३० – ६ मे १९४१
मागील अलेक्सेई रायकोव
पुढील स्टॅलिन

सोव्हिएत परराष्ट्रमंत्री
कार्यकाळ
३ मे १९३९ – ४ मार्च १९४९

जन्म ९ मार्च, १८९० (1890-03-09)
सोवेत्स्क, रशियन साम्राज्य
मृत्यू ८ नोव्हेंबर, १९८६ (वय ९६)
मॉस्को, रशियन सोसासंप्र
राजकीय पक्ष सोव्हिएत संघाचा कम्युनिस्ट पक्ष
धर्म नास्तिक
सही व्याचेस्लाव्ह मोलोतोव्हयांची सही

व्याचेस्लाव्ह मोलोतोव्ह (रशियन: Вячеслав Молотов; ५ डिसेंबर १८६७ - १२ मे १९३५) हा एक सोव्हिएत राजकारणी व जोसेफ स्टॅलिनचा निकटचा सहकारी होता. तो १९३० च्या शतकादरम्यान सोव्हिएत संघाचा प्रमुख तर १९३९ ते १९४९ दरम्यान परराष्ट्रमंत्री होता.

१९३९ साली दुसऱ्या महायुद्धाच्या सुरुवातीच्या काळात सोव्हिएत व नाझी जर्मनी ह्यांच्या दरम्यान झालेल्या गुप्त करारामध्ये मोलोतोव्हने सहभाग घेतला होता. मोलोटोव्ह-रिबेनट्रॉप करार ह्या नावाने मोलोतोव्ह व नाझी परराष्ट्रमंत्री योआखिम फॉन रिबेनट्रॉप ह्यांच्यामध्ये झालेल्या ह्या करारामध्ये पोलंड देशाचे विभाजन व एकमेकांवर अनाक्रमणाचे वचन दिले गेले होते.

युद्ध संपल्यानंतर मोलोतोव्हचे सोव्हिएतमधील महत्त्व कमी झाले. स्टॅलिनच्या मृत्यूनंतर मोलोतोव्हने स्टॅलिनच्या धोरणांचा पाठिंबा चालू ठेवला. तो निकिता ख्रुश्चेव्हच्या राजवटीचा मोठा टीकाकार होता.

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: