Jump to content

व्यभिचार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

व्यभिचार (इंग्रजी: Adultery) हे विवाहबाह्य लैंगिक संबंध आहे ज्यास सामाजिक, धार्मिक, नैतिक किंवा कायदेशीर कारणास्तव आक्षेपार्ह मानले जाते. लैंगिक कृत्ये ज्यास व्यभिचार म्हणतात हे वेगवेगळे आहेत. तसेच याचे सामाजिक, धार्मिक आणि कायदेशीर परिणाम देखील भिन्न असतात. परंतु ही संकल्पना बऱ्याच संस्कृतींमध्ये अस्तित्वात आहे आणि ख्रिस्ती, इस्लाम आणि यहुदी धर्मात ही संकल्पना समान आहे. लैंगिक संभोगाची एक क्रिया सामान्यत: व्यभिचार करण्यासाठी पुरेसे असते आणि दीर्घकालीन लैंगिक संबंध कधीकधी प्रेम प्रकरण म्हणून ओळखले जाते.[१]

ऐतिहासिकदृष्ट्या, बऱ्याच संस्कृतींनी व्यभिचार हा एक अत्यंत गंभीर गुन्हा मानला आहे. काही संस्कृतींमध्ये, सामान्यत: स्त्रीसाठी आणि कधीकधी पुरुषासाठी, या साठी दंडात्मक शिक्ष, मृत्युदंड, छळ अश्या शिक्षेस पात्र ठरविले जाते. विशेषतः १९व्या शतकापासून पाश्चात्य देशांमध्ये अशा शिक्षेत हळूहळू घट झाली आहे, ज्या देशांमध्ये व्यभिचार अद्याप गुन्हा ठरतो तेथे दंड, छडीचा मार किंवा मृत्युदंड पण दिला जातो. २०व्या शतकापासून व्यभिचाराविरूद्ध फौजदारी कायदे वादग्रस्त ठरले आहेत कारण बहुतेक पाश्चात्य देश व्यभिचाराला दंडनीय गुन्हा मानत नाही.

तथापि, व्यभिचारास अदंडनीय गुन्हा ठरविलेल्या अधिकारक्षेत्रांतही अद्याप त्याचे कायदेशीर परिणाम होऊ शकतात, विशेषतः घटस्फोटाच्या कायद्यांच्या क्षेत्रामध्ये, ज्यात व्यभिचार जवळजवळ नेहमीच घटस्फोटाचे कारण ठरतो आणि पूढे मालमत्ता वाटणी, मुलांचा ताबा, पोटगी वगैरे इत्यादी बाबींमध्ये व्यभिचार निर्णायक भूमिका बजावतो.

गुन्हेगारी न्यायासाठी शरिया कायद्याचे पालन करणारे मुस्लिम देशांमध्ये व्यभिचाराची शिक्षा दगडांचा मार असू शकते.[२] असे पंधरा[३] देश आहेत ज्यात दगडांने मार करण्यास कायदेशीर शिक्षेची अधिकृतता आहे, जरी अलिकडच्या काळात हे फक्त इराण आणि सोमालियामध्ये कायदेशीररित्या पार पाडले गेले आहे.[४] व्यभिचारास गुन्हा मानणारे बहुतेक देश असे आहेत ज्यात प्रबळ धर्म म्हणजे इस्लाम आहे किंवा सहारातील आफ्रिकन ख्रिश्चन-बहुसंख्य देश आहेत. परंतु फिलिपीन्स, तैवान आणि अनेक अमेरिकन राज्ये या नियमात अपवाद आहेत. काही अधिकार क्षेत्रात राजाची पत्नी किंवा त्याच्या मोठ्या मुलीशी किंवा त्याच्या मोठ्या मुलाच्या पत्नीशी लैंगिक संबंध ठेवणे हा देशद्रोह मानला आहे.

सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरा[संपादन]

हिंदू धर्म[संपादन]

हिंदू संस्कृत ग्रंथांमध्ये व्यभिचार करण्याबद्दल अनेक मते आहेत. ऋग्वेदच्या ४.५.५ स्तोत्रात व्यभिचारस पाप असे म्हणटले आहे. इतर वैदिक ग्रंथांमध्ये व्यभिचारास पाप, जसे की खून, अनैतिकता, राग, वाईट विचार आणि लबाडीशी तुलना केली आहे. यात सहसा व्यभिचाराचा निषेध केला जातो, काही अपवाद आहेत जसे सहमतीने लैंगिक संबंध आणि नियोग. या ग्रंथांमध्ये सूचविलेल्या शिक्षाही भिन्न आहेत.

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Encyclopædia Britannica Online, "Adultery"". Britannica.com. 12 July 2010 रोजी पाहिले.
  2. ^ "Punishment for adultery in Islam". Religioustolerance.org. Archived from the original on 2020-04-16. 26 February 2015 रोजी पाहिले.
  3. ^ Thomson Reuters Foundation. "INFOGRAPHIC: Stoning - where is it legal?". Trust.org. Archived from the original on 2015-11-22. 26 February 2015 रोजी पाहिले.
  4. ^ Mic (16 October 2013). "Women Around the World Are Being Stoned to Death. Do You Know the Facts?". Mic. 26 February 2015 रोजी पाहिले.