व्यंकटेश महाजन महाविद्यालय उस्मानाबाद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

तपस्वी पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित व्यंकटेश महाजन महाविद्यालयाची स्थापना सन १९९९-२००० मध्ये करण्यात आली असून या महाविद्यालयात कला व विज्ञान या विद्याशाखेचे शिक्षण दिले जाते. ऱाष्ट्रीय विचारांचा प्रभाव असलेले व सामाजिक निर्मिती करणारे शिक्षण देऊन स्वावलंबी व स्वाभीमानी विद्यार्थी घडविण्याच्या उद्देशाने शिक्षणक्षेत्रात संस्थेने पहिले पाऊल टाकले आहे.आर्थिक दुर्बलता आणि भौगोलिक प्रतिकुलता यांवर मात करत अशासकीय पद्धतीने शिक्षणातून समाज परिवर्तन करण्याचे दायित्व या संस्थेने स्वीकारले आहे. विद्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे शिक्षण मिळावे व या करिता संगणकशास्त्र व सुक्ष्मजीवशास्त्र हे विषय संस्थेने उपलब्ध करून दिले आहे.

महाविद्यालयाचे कार्य: विद्यार्थ्यांचाया मनात समर्पणाची भावना व उत्कृष्टता जोपासून भारताची समृद्धी वाढविण्याची, सामाजिक हितासाठी ज्ञानदान करणे व ज्ञानाचा पाठपुरावा करणे हे या संस्थेचे कार्य आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांचा बौद्धिक, सामाजिक, भावनिक, शारीरिक व आध्यात्मिक विकासासाठी हे महाविद्यालय कसोशीने प्रयत्न करते.

महाविद्यालयाचे उद्दिष्ट्ये: १. स्री व पुरूष यांच्यात तांत्रिक , कलात्मक, सामाजिक व वैज्ञानिक क्षमता आणि श्रेष्ठता निर्माण करण्यासाठी शिक्षणास मुक्तदार पुरविणे व त्याच बरोबर त्याच्यात दृढ मूल्यात्मक पाया असणारे चारित्र्य निर्माण करणे. २. समरसतेसोबतच व्यक्तिस्वातंत्र्यास प्रोत्साहन देणे. ३. विद्यार्थ्यांच्या चारित्र्यात प्रामाणिकपणा, चातुर्य, प्रेरणा निर्माण करणे. ४. व्यावसायिक कौशल्य निर्माण करणे. ५. न्याय व रचनात्मक स्पर्धेत प्रोत्साहन देणे.