Jump to content

वोल्फगांग आमाडेउस मोझार्ट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
वोल्फगांग आमाडेउस मोझार्ट
Wolfgang Amadeus Mozart
जन्म २७ जानेवारी १७५६
साल्झबुर्ग
मृत्यू ५ डिसेंबर १७९१ (वयः ३५)
व्हियेना,ऑस्ट्रिया
कार्यकाळ १७६२ - १७९१
स्वाक्षरी वोल्फगांग आमाडेउस मोझार्ट ह्यांची स्वाक्षरी

वोल्फगांग आमाडेउस मोझार्ट (जर्मन: Wolfgang Amadeus Mozart; २७ जानेवारी १७५६ - ५ डिसेंबर १७९१) हा अठराव्या शतकातील एक श्रेष्ठ व प्रभावी संगीतकार होता. ऐतिहासिक संगीत पर्वामधील तो सर्वात लोकप्रिय संगीतकार मानला जातो. सिंफनी, पियानो, कोरस, कन्सेर्तो इत्यादी प्रकारांमध्ये त्याने सुमारे ६०० संगीतरचना केल्या ज्यांपैकी अनेक रचना आजवरच्या संगीतामधील सर्वोत्तम मानल्या जातात.

पवित्र रोमन साम्राज्यातील सध्याच्या ऑस्ट्रियातील साल्झबुर्ग येथे जन्मलेल्या मोझार्टने वयाच्या पाचव्या वर्षापासून पेटी व व्हायोलिनवर संगीतरचना करण्यास सुरुवात केली. वयाच्या सतराव्या वर्षी त्याने साल्झबुर्ग सोडले व ऑस्ट्रियाची राजधानी व्हियेनामध्ये वास्तव्यास आला. त्याच्या अनेक अजरामर रचनांची निर्मिती येथेच झाली. संगीतकार ह्या पेशामध्ये त्याला भरपूर प्रसिद्धी मिळाली परंतु त्याची आर्थिक स्थिती हलाखीचीच राहिली. १७९१ साली ३५ वर्ष वयाचा असताना त्याचे गूढ परिस्थितीमध्ये निधन झाले. मृत्यूपूर्वी त्याने निर्माण केलेल्या संगीतरचना आजवर सर्वोत्तम मानल्या जातात.

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: