वैशाली येडे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

वैशाली येडे या ९२व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या उद्घाटक होत्या. त्यांची उद्घाटक म्हणून निवड अखिल भारतीय साहित्य महामंडळाने केली.त्यांचे वय अठ्ठावीस वर्षे आहे.[१]

इतिहास[संपादन]

त्या यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील राजूरा या गावच्या रहिवासी आहेत.त्यांच्या पतीने सात वर्षांपूर्वी सन २०११ मध्ये कर्जाला कंटाळून आत्महत्या केली. त्यानंतर त्यांना अनेक वाईट परिस्थितीला सामोरे जावे लागले.तशाही परिस्थितीत हार न मानता त्यांनी आपला जीवनसंघर्ष सुरू ठेवला. त्यांना दोन अपत्ये आहेत.[२]

त्या राजूरा गावात अंगणवाडी मदतनीस म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी तेरवं या नाटकात भूमिका केली आहे.हे नाटक त्यांच्या जीवनकहाणीवर आधारीत आहे.

संदर्भ[संपादन]

  1. ^ लोकमत न्यूझ नेटवर्क. "आत्महत्याग्रस्त शेतकरी महिलेला साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाचा मान;सोहळ्यावरील वादाचे मळभ दूर". १३ जानेवारी २०१९ रोजी पाहिले.[permanent dead link]
  2. ^ "आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याची पत्नी उद्घाटक". १३-०१-२०१९ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)