वैवाहिक समुपदेशन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

वैवाहिक समुपदेशनामध्ये प्रामुख्याने दोन गोष्टींचा समावेश होतो, विवाहपूर्व समुपदेशन आणि विवाहानंतरचे समुपदेशन.

विवाहपूर्व समुपदेशन[संपादन]

लग्नासाठी जोडीदार निवडताना बराच वेळा सखोल माहिती करतानाच, जोडीदाराची बौद्धिक, आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक आणि सर्वात महत्वाचे मानसिक आरोग्य या संबंधित विचार करणे गरजेचे असते. अनुरूपता पडताळताना जोडीदाराशी आणि त्याच्या कुटुंबाशी संवाद साधणे खूप महत्वाचे असते.फक्त पत्रिका, आणि नातेवाईक किवा ओळखीचे लोक यांजकडून घेतलेल्या माहितीवर अवलंबून न राहता . प्रत्यक्ष भावी जोडीदाराशी संवाद साधणे, तसेच त्याच्या आवडी -निवडी , त्याचे आचार- विचार, घरातील वातावरण, त्याचे घरातिल व्यक्तींशी तसेच सामाज्याशी असलेले संबंध, त्याचा स्वभाव, क्षमता, इत्यादी अनेक बाबतीमध्ये लक्षपूर्वक बघावे लागते. हे करत असतानाच जोडीदाराला समजून घेणे व त्यासाठी गाठी भेटी होणे महत्वाचे असते. बराच वेळा आपल्या अपेक्षा व जोडीदारच्या अपेक्षा यांची पडताळणी करणे गरजेचे असते. कुठल्याही प्रकारची ग्वाही जोडीदाराला न देता, स्वतःतील क्षमता तसेच कमतरता यांबद्दल ची माहिती द्यावी व घ्यावी. हे सर्व करतानाच बराच वेळा सामुपादेशनाचाही फायदा होतो.

विवाहानंतरचे समुपदेशन[संपादन]

पती-पत्नी मधील नातेसंबध व त्याचा घरातील वातावरणावर, कुटुंबावर, कामावर आणि समाजावर होणारा परिणाम या संबंधित मार्गदर्शन हे तज्ञ समुपदेशक करतो. बराच वेळा कौटुंबिक भांडणे, पती-पत्नी मधील गैरसमज, तक्रारी तसेच अपेक्षांचे ओझे, विसंवाद, यांमध्ये समाजातील इतर व्यक्तींची झालेली लुडबुड, या आणि इतर अनेक गोष्टींचा एकत्रित परिणाम हा जोडप्यांच्या वैवाहिक संबंधावर झालेला दिसून येतो. या साठीच्या समायोजनासाठी समुपदेशन करून घेणे हि काळाची गरज आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही.