वेब डिझायनिंग
विकिपीडियाचा दर्जा राखण्यासाठी या लेखास किंवा विभागास विकिकरणाची गरज आहे. उपयुक्त विकिदुवे देऊन या लेखाचे विकिकरण करण्यास कृपया मदत करा]. संक्षिप्त मार्गदर्शन दाखवा
|
हा लेख कोणत्याच वर्गात जोडल्या गेला नाही. कृपया त्यात वर्ग जोडण्यास मदत करा जेणेकरुन तो त्यासम लेख यादीत येईल. ({{{date}}}) (कृपया वर्गीकरण झाल्यावर हा साचा काढून टाकावा.) |
उपलब्ध असलेल्या कला कौशल्याचा वापर करून वेबसाईट तयार करणे आणि त्यानंतर त्याची देखभाल करण्याच्या कार्यवाहीस वेब डिझायनिंग असे म्हणतात. वेब ग्राफिक डिझाईन, इंटरफेस डिझाईन, अथॉरींग, स्टॅण्डर्डडाईझ कोड, प्रोपरायटरी सोप्टवेअर, यूझर एक्सपिरीअन्स डिझाईन आणि सर्च इंजिन ऑप्टीमायझेशन इत्यादी बाबी वेब डिझायनिंगमध्ये समाविष्ट आहेत. या प्रत्येक बाबींवर गटामधील वेगवेगळया व्यक्तींकडून कार्यवाही केली जाते. काही वेळा एकाच व्यक्तीकडून सर्व बाबींवर एकाच वेळेस कार्यवाही केली जाते.[१] वेब डिझायनरला ग्राहकांच्या मनात येणारे प्रश्न कोणते असतील याचा दूररर्शीपणा असणे आवश्यक आहे. याव्यतिरिक्त जर वेब डिझायनिंगमध्ये ‘मार्क अप’ ही बाब करावयाची झाल्यास उपलब्ध्ा असलेल्या गाईडलाईनवर अदययावत माहिती उपलब्ध करून दयावी लागते.
इतिहास
[संपादन]१९८८-२००१
[संपादन]इंटरनेटशिवाय हलते ग्राफिक्स, टायफोग्राफी, संगीत इत्यादी गोष्टींची कल्पना करता येणे अशक्य आहे. हा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग झालेला आहे.
वेब आणि वेब डिझाईनची सुरुवात
[संपादन]१९८९ मध्ये टीम बर्न्सस-लि यांनी सीईआरएन कंपनीमध्ये काम करत असतांना ग्लोबल हायपरटेक्स प्रोजेक्ट तयार केले जे नंतर सर्व जगात वेब साठी वापरले गेले. १९९१ - १९९३ च्या दरम्यान संपूर्ण जगात वापरता येण्यासारखे वेब तयार झाले. त्या काळात साध्या ओळींनी बनविलेले ब्राऊझर वापरून पानांवरील मजकूर बघता येत होता.[२] १९९३ मध्ये मार्क ॲर्न्डसीन आणि एरिक बिना यांनी तयार केलेल्या मोझॅक ब्राउझरमुळे पूर्वी बनविण्यात येणा-या आवाजाशिवाय आणि ग्राफिकशिवायच्या ब्राउझरचा ढाचा संपूर्णपणे बदलून गेला.[३] १९९४ मध्ये तयार झालेल्या डब्ल्यू३सी या तंत्रामुळे जावास्क्रीप्ट, एचटीएमएल, कॅसकॅडिंग यासारख्या संपूर्ण जगात वापरता येण्यासारखे ब्राउझर तयार झाले.[४]
वेब डिझाईनिंगमधील क्रांती
[संपादन]१९९६ च्या सुमारास मायक्रोसॉफटने पहिले स्पर्धात्मक ब्राऊझर तयार केले. यानंतर वेब डिझायनिंगमध्ये क्रांती घडून अनेक ब्राऊझर तयार करण्यात आले आणि त्यांच्यामध्ये स्पर्धा घडू लागली. १९९६ मध्ये सुधारित झालेल्या फलश या तंत्रज्ञानामुळे ब्राऊझरची मोठया प्रमाणावर निर्मिती होवू लागली आणि साईट विकसित करण्यासाठी याचा खूप उपयोग झाला.[४][५]
पहिल्या बॉउझर युद्धाची समाप्ती
[संपादन]२००० मध्ये मायक्रोसॉप्टने विकसित केलेल्या इंटरनेट एक्सप्लोररमुळे नेटस्केपसारख्या कंपनीची मायक्रोसॉप्टबरोबर असलेली स्पर्धा संपूष्टात आली आणि नेटस्केपला या युद्धातून माघार घ्यावी लागली. इंटरनेट एक्सप्लोरर या ब्राउझरमुळे मायक्रोसॉप्टची वेब डिझायनिंगच्या क्षेत्रामधील मक्तेदारी कायम राहिली.[४]
२००१-२०१२
[संपादन]२१ व्या शतकाच्या सुरुवातीस वेबच्या तंत्रज्ञानामध्ये जसजसे बदल होत गेले तसतसे लोकांच्या आयुष्यामध्ये वेबचे महत्त्व वाढत गेले.
मॉर्डन ब्राऊझर
[संपादन]मायक्रोसॉप्ट इंटरनेट एक्सप्लोररपेक्षा चांगल्या प्रतीचे नवीन ब्राऊझर अस्तित्वात आल्यामुळे त्यांच्यामधील स्पर्धा कमी झाली.
नवीन परिमाणे
[संपादन]डब्ल्यू३सी कडून एचटीएमएल (एचटीएमएल५) आणि सीएसएस (सीएसएस३), नवीन जावास्क्रिप्ट एपीआय ही नवीन परिमाणे अस्तित्वात आल्यामुळे याचा वापर सर्वांना करता येणे शक्य झाले.
नवीन क्ल्युप्त्या आणि तंत्रज्ञान
[संपादन]एचटीएमएल५, सीएसएस३ आणि जावास्क्रिप्ट ही नवीन ब्राउझर असून ती जगभरात वापरली जातात.[६]
कौशल्य आणि तंत्रे
[संपादन]उत्पादनाच्या प्रकाराप्रमाणे वेब डिझायनरला डीझाईन करताना आज्ञावल्या वापराव्या लागतात. दिवसेंदिवस तंत्रज्ञानामध्ये बदल होत जातो त्याप्रमाणात नवीन परिमाणे तयार केली जातात आणि वापरात आणली जात असली तरी त्यामागील मूळ तत्त्व बदलत नाही.
बाजारपेठ आणि संवाद आराखडा
[संपादन]वेबसाईटवरील मार्केटिंग आणि कम्युनिकेशन डिझाईन एका ठराविक गट समूहासाठी असून ती बनविताना वयोगटाचा , त्या भागातील परंपरांचा विचार करणे आवश्यक आहे. अशा प्रकारची वेबसाईट बनविताना माहिती अचूक आणि स्पष्ट असावी लागते.[७]
यूझर एक्सप्रिरीअन्स डिझाईन आणि इंटरॲक्टीव्ह डिझाईन
[संपादन]वेबसाईट कशा प्रकारे काम करते याची जाण असणा-या दर्शकांना वेब डिझाईन केलेल्या साईटमधील तपशील लक्षात येउु शकतो. म्हणजेच जाणकार माणूस वेबसाईट मधील तपशीलाचा अचून वापर करून स्वतःच्या फायदयासाठी वापरू शकतो.
पेज लेआउुट
[संपादन]पेजलेआऊटची प्रतवारी हा वेब डिझायनिंग करताना महत्त्वाचा मुद्दा असून वापरणा-यांवर त्याचा परिणाम होत असतो. डिझायनरला साईटचे पान बनविताना त्या पानाचा पिक्सेल विडथ लक्षात घ्यावी लागते आणि त्यानुसार वेबसाईट डिझाइन करावी लागते. जगप्रसिद्ध ब्राउझर विंडो असलेल्या वेबसाईटमध्ये पेज विडथ सर्वत्र सारखीच असल्याचे दिसून आले आहे.[८]
टायपोग्राफी
[संपादन]वेबसाईट बनविण्याची पद्धत सर्वत्र सर्वसाधारणपणे सारखीच असते. गुंतागुंत टाळण्यासाठी ठराविक फॉण्ड असलेलेच ब्राऊझर वापरले जातात. सफारी ३.१, ऑपेरा १० आणि मोझिला फायरफॉक्स ३.५ हे सर्वसाधारण वापरण्यात असलेले ब्राऊझर आहेत.
मोशन ग्राफीक्स
[संपादन]वेब डिझाईनिंगमध्ये हलते चित्र वापरल्यास पानांचे लेआऊट आणि वापरणा-याचा दृष्टीकोन यांवर फार मोठा प्रभाव पडतो. मनोरंजनत्मक वेबसाईट तयार करताना हलते चित्र वापरणे योग्य ठरते परंतु वैचारिक, गंभीर, व्यापार किंवा शासन विषयक वेबसाईट विषयाच्या गांभीर्यामुळे हलत्या चित्रांचा कमीत कमी वापर केला जातो.
संदर्भ
[संपादन]- ^ जोर्जिना., लेस्टर. "वेबसाईट तयार करण्याच्या व्यापारामध्ये नवीन नोक-यांची निर्मिती" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
- ^ "बायोग्राफी" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
- ^ "मोझॅक ब्राऊझर" (PDF) (इंग्लिश भाषेत). 2013-09-02 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2014-03-31 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- ^ a b c जेनिफर(२००६), निडर्स्ट. "मोझॅक ब्राऊझर" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
- ^ कॅमेरोन, चँपमॅन. "द इव्होल्यूशन ऑफ वेब डिझाईन,६ वी आवृत्ती" (इंग्लिश भाषेत). रोजी मूळ पानापासून संग्रहित2013-10-30. 2014-03-31 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link) CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
- ^ "वेब डिझायनिंग" (इंग्लिश भाषेत). 2014-03-12 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2014-03-31 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- ^ ,जे.ए. फ्रान्सिस्को मुंज – लिव्हा, टेव्हडोरो ल्युक (१८ मे २००७), कॅस्टेन एडा. "वेब एक्सेपटन्स् मॉडेल (डब्लयू ए एम) : यूझर एक्सपिरन्स" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: multiple names: authors list (link) CS1 maint: unrecognized language (link)
- ^ "वेब पेज साईज आणि लेआउुट" (इंग्लिश भाषेत). 2014-03-31 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2014-03-31 रोजी पाहिले.
|first=
missing|last=
(सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)