वेदांचे अनुबंध चतुष्ट्य

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Broom icon.svg
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन
हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.


वेद हा भारतीय धर्म आणि तत्त्वज्ञानाचा एकमात्र निधिभूत ग्रंथ आहे. प्राचीन काळापासून आपण वेदांना अपौरुषेय मानतो. वेद अनादी आहेत. अनंत आहेत. वेद कोणीतरी निर्माण केले असं म्हणणं म्हणजे वेदांचं महत्त्व कमी करणं होय. "यस्य निःश्वसितं वेदाः" परमात्म्याच्या निःश्वासातून वेदांचं प्रागट्य झालं. वेदांना श्रुति असंही म्हणतात. कारण वेदांचं अध्ययन सगळ्यांनी गुरू-शिष्य परंपरेनीच केलं आहे. ऐकलं आणि आत्मसात केलं. या अशा गुरू-शिष्य परंपरेला संप्रदाय असं म्हणतात. २००० वर्षांपूर्वी, वैदिक ब्राम्हण जो स्वर, जो क्रम, उदात्त-अनुदात्त वगैरे जसं म्हणायचे, पाठ करायचे, तीच परंपरा आजही, अजूनही कायम आहे. त्यात थोडा पण बदल झालेला नाही.

वेदांमध्ये ऋग्वेद हा सगळ्यात प्राचीन आणि महत्त्व पूर्ण मनाला जातो. वेद हे या संसारातील सर्वश्रेष्ठ, अति प्राचीन असा साहित्य-निधि आहे. भाषा-विज्ञानाच्या दृष्टीने आणि धर्माचं मूळ म्हणून वेदांना महत्त्व आहे. "वेदाः अखिलो धर्ममूलं". प्रत्यक्ष आणि अनुमान या प्रमाणांद्वारे जो उपाय मनुष्याला अनाकलनीय आहे,त्यांचं आकलन वेदांच्या द्वारे केला जातं.

सायणाचार्यांच्या मते "इष्टाची प्राप्ती आणि अनिष्टच परिहार" करण्याकरिता अलौकिक उपाय सांगणारा ग्रंथ म्हणजे वेद होय.

"प्रत्यक्षेण अनुमित्या वा यस्तूपायो न बुध्यते।

एतं विदन्ति वेदेन तस्माद् वेदस्य वेदता।।"

कोणत्याही रचनेच्या प्रारंभी, 'त्या रचनेचा विषय', 'त्या रचनेचं प्रयोजन', 'त्यांचा संबंध' आणि 'त्या ग्रंथाचा अधिकारी' या अनुबंध चतुष्ट्याचा उल्लेख आपल्या परंपरेत केला आहे. जो पर्यंत श्रोत्याला व्याख्यानाचा विषय, प्रयोजन, संबंध आणि व्याख्यानाचा अधिकारी यांची जाण होत नाही, तोपर्यंत त्या ग्रंथाचा अध्ययन करायला, अर्थज्ञान प्राप्त करायला आणि आपल्या बुद्धीने विचार करायला तो श्रोता प्रवृत्त होत नाही. वेदांच्या पूर्व-कांडात आणि उत्तर-कांडात विषय आहेत अनुक्रमे धर्म आणि ब्रह्म. हे दोन्हीही अनन्य लभ्य आहेत. म्हणजे, वेदांव्यतिरिक्त उपायांनी ते जनता येत नाहीत. "धर्म ब्रम्हणि वेदैकवेद्ये".

आचार्य जैमिनी म्हणतात, प्रत्यक्ष प्रमाण त्या वस्तूंचा उपलंभन करतो, जो विद्यमान आहे. पण, अविद्यमान धर्माकरिता निमित्त, प्रमाण नाही. ड्रम अनुष्ठान केल्यावर उत्पन्न होतो, म्हणून तो आधी नसतो. म्हणजे घट दिसतो, आपण पाहू शकतो, तसा धर्म दिसत नाही. म्हणून धर्माला अदृष्ट म्हंटलं आहे. कोणत्याही प्रकारचे लिंग या हेतू धर्माला नाही म्हणून अनुमान प्रमाणाने पण धर्म सिद्ध होत नाही. सुख आणि दुःख यांचं ज्ञान होणं हा धर्माचा हेतू म्हणता येईल. म्हणूनच, वेदांतील विधान धर्मात प्रमाण मानलं जातं. धर्म आणि ब्रह्म हे एकमात्र वेदांचा विषय आहे. तसेच धर्म आणि ब्रह्म यांचं ज्ञान हे वेदांचं साक्षात प्रयोजन आहे. "धर्मे सर्वं प्रतिष्ठितं" अर्थात धर्म साऱ्या संसाराची प्रतिष्ठा आहे. एकमात्र आश्रयस्थान आहे.

धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चार पुरुषार्थ आहेत. पहिलाच पुरुषार्थ आहे धर्म. या अर्थाने, ही सृष्टी धर्माची आहे. ब्रह्मज्ञानाला पुरुषार्थ सिद्ध करण्यासाठी श्रुति म्हणतात, " ब्रम्हविद्याप्नोति परम् " अर्थात, ब्रम्हाला जाणणाराच परमतत्त्व प्राप्त करून घेऊ शकतो. मोक्ष प्राप्त करू शकतो. अशा प्रकारे धर्म आणि ब्रह्म यांना जाणणाराच, ज्याला ज्ञान प्राप्तीची इच्छा आहे, तोच वेदांचा अधिकारी होतो. धर्म आणि ब्रह्म यांचा वेदांशी संबंध प्रतिपाद्य आणि प्रतिपादक भाव असा आहे. वेद म्हणजे जनक तर धर्म आणि ब्रह्म हे जन्य या भावाने संबंधीत आहेत.