वीरेंद्र शर्मा
Appearance
विरेंदर कुमार शर्मा (११ सप्टेंबर, इ.स. १९७१:हमीरपूर, उत्तर प्रदेश - ) हा हिमाचल प्रदेशकडून प्रथमवर्गीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. हा भारतातील प्रथमवर्गीय सामन्यांमध्ये पंचगिरीही करतो. नोव्हेंबर २०१६मध्ये झालेल्या मुंबई विरुद्ध उत्तर प्रदेश सामन्यात पंचगिरी करीत असताना याचा साथीदार सॅम नोगास्कीला अन्नातून विषबाधा झाल्याने शर्माने दोन्ही टोकांनी पंचगिरी केली होती.