वीरधवल खाडे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

वीरधवल खाडे (२९ ऑगस्ट, १९९१) हा ऑलिंपिक स्पर्धांत भाग घेणारा एक मराठी जलतरणपटू आहे. वयाच्या सतराव्या वर्षी तो पहिल्यांदा ऑलिंपिकसाठी निवडला गेला. त्यावेळी तो वयाने सर्वात लहान जलतरणपटू होता.

खाडेचे सर्व शिक्षण कोल्हापुरात झाले. न्यू मॉडेल कॉलेज येथे त्याने महाविद्यालयीन शिक्षण घेतले.

कारकीर्दz[संपादन]

खाडेला वयाच्या ४थ्या वर्षी वडिलांनी पोहण्यास शिकविले. त्याने कोल्हापूरमधील जलतरण शिक्षण शिबिरांत सहभाग घेतला. वयाच्या ९व्या वर्षी त्याने विविध स्पर्धांमध्ये भाग घ्यायला सुरुवात केली.

२००६मधील आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये खाडेने तीन नवीन विक्रम नोंदवीत सहा सुवर्णपदके जिंकली. चीनमधील बीजिंग येथे २००८ साली झालेल्या ऑलिंपिक स्पर्धेत त्याने ५०, १०० आणि २०० मीटरच्या फ्रीस्टाईल प्रकारात सहभाग घेतला. त्यांपैकी त्याने १०० मीटरमध्ये राष्ट्रीय विक्रम नोंदवला. त्यासाठी ५०.०७ सेकंदांचा वेळ देऊन त्याने स्वतःचाच विक्रम मोडला.

२०१० सालातील आशियाई स्पर्धेत खाडेने ५० मीटर बटरफ्लाय प्रकारात कांस्यपदक मिळवले. हे पदक भारताला २४ वर्षांनी मिळालेले पहिले पदक होते. या कामगिरीसाठी खाडेला २०१०मध्ये अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.