Jump to content

वि.पां. दांडेकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

विश्वनाथ पांडुरंग दांडेकर (जन्म : महेसाणा-गुजरात, १४ डिसेंबर १९०५; - बडोदा, १ जानेवारी १९७४) हे एक मराठी लेखक, कादंबरीकार, लघुनिबंधकार आणि समीक्षक होते.

मुंबई विद्यापीठातून एम.ए.ची पदवी मिळवल्यावर दांडेकर बडोदा येथे प्राध्यापक झाले. आपल्या अध्यापनाचा पेशा सांभाळून लेखनही ते करत होते. फेरफटका, टेकडीवरून, एक पाऊल पुढे, काळ खेळतो आहे, पंचवीस वर्षांनंतर आदी लघुनिबंधसंग्रह त्यांनी लिहिले. आशावादी आनंदी वृत्ती, जीवनाकडे उदारपणे पाहण्याचा दृष्टिकोन, सौंदर्याचे आकर्षण आणि कल्पकता तसेच विनोदाचे मिश्रण हे या लघुनिबंधांचे वैशिष्ट्य होय.

कादंबऱ्या

[संपादन]
  • कुचंबणा
  • तिशीतील तरुण
  • प्रतारणा

लघुनिबंध संग्रह

[संपादन]
  • एक पाऊल पुढे
  • काळ खेळतो आहे
  • टेकडीवरून
  • पंचवीस वर्षांनंतर
  • फेरफटका

अन्य पुस्तके

[संपादन]
  • केळकरांची सहा नाटके (समीक्षात्मक पुस्तक)
  • बडोद्याचे संस्थानिक गायकवाड यांचे चरित्र (या ग्रंथातून सयाजीराव गायकवाडांच्या कार्याचा परिचय होतो, शिवाय तत्कालीन बडोद्याची स्थिती समजते)
  • मराठी नाट्यसृष्टी : पौराणिक नाटके
  • मराठी नाट्यसृष्टी : सामाजिक नाटके (या दोन ग्रंथांमधून ४२८ पौराणिक व सामाजिक मराठी नाटकांचा त्रोटक परिचय करून दिला आहे.)
  • मराठी साहित्याची रूपरेखा (संक्षेपित साहित्येतिहास)