विश्वनाथ त्रिपाठी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

डॉ. विश्वनाथ त्रिपाठी (१६ फेब्रुवारी, इ.स. १९३३:बिशकोहर, बस्ती जिल्हा, उत्तर प्रदेश)हे हिंदीतील एक नावाजलेले लेखक आहेत. त्यांचे शिक्षण बनारस विश्व हिंदू विद्यापीठपंजाब विद्यापीठात झाले.

डॉ. त्रिपाठी हे लेखक होण्यापूर्वी शिक्षक होते. त्यांनी पत्रकारिता व इतिहास हे विषय शिकवले आहेत. समीक्षा लेखनाखेरीज त्यांनी कादंबरीलेखन व काव्यरचनाही केल्या आहेत.

त्रिपाठींनी लिहिलेले व्योमकेश दरवेश हे पुस्तक त्यांचे गुरू आचार्य हजारी प्रसाद द्विवेदी यांच्याविषयी आहे. त्यात जीवन, आठवणी, आत्मकथन व इतिहास यांच्या जोडीला समीक्षाही आहे.

डॉ. विश्वनाथ त्रिपाठी यांनी लिहिलेली पुस्तके[संपादन]

  • कुछ कहानियाँ कुछ विचार (समीक्षा)
  • जैसा कह सका (कविता)
  • देश के दौर में
  • नंगतलाई का गांव (आत्मकथा)
  • पेड का हाथ
  • मीरा का काव्य (समीक्षा)
  • व्योमकेश दरवेश (चरित्र)

डॉ.विश्वनाथ त्रिपाठी यांना मिळालेले सन्मान आणि पुरस्कार[संपादन]

  • गोकुलचंद्र शुक्ल समीक्षा पुरस्कार
  • डॉ.रामविलास शर्मा सन्मान
  • व्यास सन्मान (२०१४, व्योमकेश दरवेश)
  • मूर्तिदेवी पुरस्कार (२०१५, व्योमकेश दरवेश)
  • सोव्हिएट लँड नेहरू पुरस्कार