"सप्टेंबर ११, २००१ चे दहशतवादी हल्ले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.7.3) (Robot: Modifying la:11 Septembris 2001 to la:Impetus 11 Septembris
छो r2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: af:11 September 2001 aanvalle
ओळ १०: ओळ १०:
[[वर्ग:न्यू यॉर्क शहर]]
[[वर्ग:न्यू यॉर्क शहर]]


[[af:11 September 2001 aanvalle]]
[[als:Terroranschläge am 11. September 2001]]
[[als:Terroranschläge am 11. September 2001]]
[[ar:أحداث 11 سبتمبر 2001]]
[[ar:أحداث 11 سبتمبر 2001]]

१६:०७, ३० जानेवारी २०१३ ची आवृत्ती

न्यूयॉर्क शहरातील वर्ड ट्रेड सेंटर इमारतींना लागलेली आग

सप्टेंबर ११, २००१ चे दहशतवादी हल्ले अल कायदा ह्या दहशतवादी संघटनेच्या आत्मघातकी पथकाने अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशावर केले. ह्या हल्ल्यांमध्ये १९ अल-कायदा दहशतवाद्यांनी ११ सप्टेंबर, २००१ रोजी ४ प्रवासी विमानांचे अपहरण केले. ह्यातील २ विमाने न्यूयॉर्क शहरातील वर्ड ट्रेड सेंटरच्या दोन गगनचुंबी इमारतींत घुसवण्यात आली. ह्या विमानांच्या हल्ल्यामुळे दोन्ही इमारतींना भीषण आग लागली व त्या आगीत जळून ह्या इमारती पुर्णपणे जमीनदोस्त झाल्या. अपहरण केलेले तिसरे विमान अमेरिकेच्या सुरक्षा विभागाचे मुख्यालय पेंटॅगॉन मध्ये घुसवले गेले व चौथे विमान पेन्सिल्व्हेनिया राज्यातील एका छोट्या गावात कोसळले. चारही विमानांतील सर्व प्रवासी ठार झाले. ह्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये एकुण २,९७४ बळी गेले.

ह्या हल्ल्यांची थेट परिणति अमेरिकेने अफगाणिस्तानातील तालिबानच्या सरकारविरुद्ध सर्व सामर्थ्यानिशी सुरु केलेल्या युद्धात झाली.

हल्ले

मंगळवार ११ सप्टेंबर, २००१ च्या पहाटे बोस्टनवॉशिंग्टन ह्या विमानतळांवरुन सान फ्रान्सिस्कोलॉस एंजेल्स कडे जाणाऱ्या विमानांमध्ये १९ अल कायदा दहशतवादी होते. ह्या विमानांनी हवेत उड्डाण केल्यानंतर थोड्याच वेळात ह्या दहशतवाद्यांनी वैमानिक व इतर कर्मचाऱ्यांना ठार केले व विमानांचा ताबा मिळवला. ह्या हल्ल्यातील सर्व मुख्य दहशतवाद्यांनी विमान उडवण्याचे प्रशिक्षण घेतले होते व त्या जोरावर त्यांनी विमाने हव्या त्या दिशेने वळवली. अमेरिकन एअरलाईन्स ११ वे विमान सकाळी ८:४६ वाजता न्यूयॉर्क शहरातील वर्ड ट्रेड सेंटरच्या उत्तरेकडील इमारतीवर आदळवले गेले.