"जांभूळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
|||
ओळ १: | ओळ १: | ||
[[चित्र:जांभूळ १.JPG|250px|thumb|जांभळीला फूटलेला मोहोर]] |
|||
वनस्पतिशास्त्रीय रेखाचित्र]] |
|||
'''जांभूळ''' हा मूलतः [[दक्षिण आशिया]] व [[आग्नेय आशिया]]त आढळणारा, जंबुल कुळातील (मिरटॅशिए कुळातील) सदाहरित, सपुष्प वृक्ष आहे. याला उन्हाळ्यात फळे [[जांभळा|जांभळ्या]] रंगाची, गोड-तुरट चवीची फळे येतात. आकारमानाने ही फळे पेवंदी बोराएवढी असतात. |
'''जांभूळ''' हा मूलतः [[दक्षिण आशिया]] व [[आग्नेय आशिया]]त आढळणारा, जंबुल कुळातील (मिरटॅशिए कुळातील) सदाहरित, सपुष्प वृक्ष आहे. याला उन्हाळ्यात फळे [[जांभळा|जांभळ्या]] रंगाची, गोड-तुरट चवीची फळे येतात. आकारमानाने ही फळे पेवंदी बोराएवढी असतात. |
||
११:३२, ९ जानेवारी २०१३ ची आवृत्ती
जांभूळ हा मूलतः दक्षिण आशिया व आग्नेय आशियात आढळणारा, जंबुल कुळातील (मिरटॅशिए कुळातील) सदाहरित, सपुष्प वृक्ष आहे. याला उन्हाळ्यात फळे जांभळ्या रंगाची, गोड-तुरट चवीची फळे येतात. आकारमानाने ही फळे पेवंदी बोराएवढी असतात.
उपयोग
औषधी गुणधर्मांचा उपयोग
जांभूळ हे फळ मधुमेह या रोगावर गुणकारी आहे.[ संदर्भ हवा ], जांभूळ हे पाचक आहे असेही मानले जाते. ते अतिसार थांबविणारे औषध आहे. याच्या पानांचा रस आणि सालीपासून तयार केलेला काढा घेतल्यानेही अतिसाराला प्रतिबंध होतो असे मानतात. जांभळाच्या बियांचे चूर्ण हे मधुमेहावर गुणकारी औषध आहे. प्लीहा व यकृताच्या विकारात जांभळे गुणकारक असतात. हे फळ पोटात गेलेले केस नाहीसे करते असा समज आहे.[ संदर्भ हवा ] जांभळाचे आसव बनवता येते. जांभळापासून दारू बनवली जाते तसेच वाइनची निमिर्तीही होऊ शकते.
जाती
कृष्णगिरी ही जात कोइमतूर भागात प्रसिद्ध आहे.
सांस्कृतिक संदर्भ
हिंदू संस्कॄतीतील संदर्भ
जांभूळ रोहिणी नक्षत्राचा आराध्यवृक्ष आहे.
बाह्य दुवे
- (इंग्लिश भाषेत) http://www.hear.org/pier/species/syzygium_cumini.htm. Missing or empty
|title=
(सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)