"राज्यव्यापी शिक्षक साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: पहिले राज्यव्यापी शिक्षक संमेलन मुंबईतील रवींद्र हॉलमध्ये १६ ऑ... |
(काही फरक नाही)
|
१७:१५, २९ मार्च २०१२ ची आवृत्ती
पहिले राज्यव्यापी शिक्षक संमेलन मुंबईतील रवींद्र हॉलमध्ये १६ ऑक्टोबर २०१० ला झाले. कवयित्री नीरजा त्याच्या अध्यक्षा होत्या.
दुसऱ्या राज्यव्यापी शिक्षक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी संत साहित्याचे गाढे अभ्यासक प्रा. सदानंद मोरे होते. १९ जानेवारीला २०१२ला दादरमधील राजा शिवाजी विद्यालयात हे संमेलन झाले. या संमेलनाचे उद्घाटन वसंत आबाजी डहाके यांनी केले. संमेलनाची प्रयोजक संस्था इंडियन एज्युकेशन सोसायटी होती.
या संमेलनात "मराठी हा शालेय विषय स्कोअरिंग कसा होईल?' या विषयावर चर्चा झाली. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक मंडळाच्या माजी अध्यक्षा उज्ज्वला पाटील या चर्चेत सहभागी झाल्या होत्या. ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शक वामन केंद्रे आणि शिक्षक आमदार कपिल पाटील यांच्या भाषणाने संमेलनाच्या सकाळच्या सत्राचा चा समारोप झाला.
संमेलनात दुपारी कवी संमेलन झाले. शिक्षकांसाठी यावेळी विविध स्पर्धाही झाल्या.
या संमेलनाच्या निमित्ताने, अशी संमेलने भविष्यकाळात भरवण्यासाठी, शिक्षकांच्या साहित्य प्रज्ञेचा शोध घेण्यासाठी, भाषा आणि साहित्य अध्यापनाच्या आशयसमृद्घीसाठी शिक्षक साहित्य संमेलन ही नवी संस्था स्थापन करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती महामंडळाचे अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष उषा तांबे या संस्थेच्या मानद सचिव आहेत.