"सदाशिव कानोजी पाटील" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो →‎संदर्भ: bad link repair using AWB
(चर्चा | योगदान)
ओळ ९: ओळ ९:


===अमेरिकेकडून अन्न आयात===
===अमेरिकेकडून अन्न आयात===
केंद्रीय मंत्रिमंडळात अन्न आणि कृषिमंत्री पदाच्या काळात ऑगस्ट इ.स. १९६० मध्ये तत्कालीन दुष्काळ आणि अन्न तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर;सदाशिव कानोजी पाटीलांनी तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि मंत्रिमंडळ साशंक असतानाही, आमेरिकेकडून पुढील चारवर्षांच्या काळाकरिता १.३ अब्ज [[अमेरिकन डॉलर]] किमतीचा १.६ कोटी टन अमेरिकन गहू आणि १,०००,००० टन तांदूळ आयात करण्याचा निर्णय घेववून तत्कालीन आमेरिकी अध्यक्ष ड्वाईट आयसेनहोवर यांच्या सोबत द्विपक्षीय करार केला. इ.स. १९४७-१९५१ या काळातील मार्शल प्लानानंतर ही आमेरिकेची परराष्ट्रास सर्वांत मोठी मदत होती.या करारान्वये भारताने रूपयात पैसे मोजावयाचे होते आणि या रकमेच्या ८५% रक्कम भारतास कर्ज आणि देणगीच्या स्वरूपात परत मिळणार होते.<ref>[http://www.time.com/time/magazine/article /0,9171,894869,00.html#ixzz0rHAHP5o9 मे १६, १९६०चा टाईम नियतकालिकाची आवृत्ती] १९ जून इ.स. २०१० सकाळी ११.४० वाजता आंतरजालावर जशी दिसली</ref>. तत्कालीन आंतरराष्ट्रीय राजकारणात नेहरूंच्या पुढाकाराखाली अमेरीकेस सलणारी भारताची काहीशी सोवियेत संघाकडे झुकलेली अलिप्ततावादी भूमिका आणि साम्यवादी चीनशी ताणत चाललेले संबध या पार्श्वभूमीवर ह्या अमेरीकन मदतीकडे पाहिले गेले. शिवाय अमेरिकी अध्यक्ष ड्वाईट आयसेनहोवर यांचे सीआयए गुप्तचरांच्या करवी तत्कालीन इराणाची लोकशाही सरकार उलथवण्याचे कारस्थानही भारतीय साशंकतेस कारणीभूत होते. {{संदर्भ हवा}}
केंद्रीय मंत्रिमंडळात अन्न आणि कृषिमंत्री पदाच्या काळात ऑगस्ट इ.स. १९६० मध्ये पडलेल्या दुष्काळ आणि अन्न तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर, स.का.पाटलांनी तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि मंत्रिमंडळ साशंक असतानाही, अमेरिकेकडून पुढील चार वर्षांच्या काळाकरिता १.३ अब्ज [[अमेरिकन डॉलर]] किमतीचा १.६ कोटी टन अमेरिकन गहू आणि १,०००,००० टन तांदूळ आयात करण्याचा निर्णय घेववून तत्कालीन अमेरिकी अध्यक्ष ड्वाईट आयसेनहोवर यांच्या सोबत द्विपक्षीय करार केला. इ.स. १९४७-१९५१ या काळातील मार्शल प्लाननंतर ही अमेरिकेने दुसर्‍या राष्ट्रास केलेली सर्वांत मोठी मदत होती. या करारान्वये भारताने रुपयात पैसे मोजावयाचे होते आणि या रकमेच्या ८५% रक्कम भारतास कर्ज आणि देणगीच्या स्वरूपात परत मिळणार होती.<ref>[http://www.time.com/time/magazine/article /0,9171,894869,00.html#ixzz0rHAHP5o9 मे १६, १९६०चा टाईम नियतकालिकाची आवृत्ती] १९ जून इ.स. २०१० सकाळी ११.४० वाजता आंतरजालावर जशी दिसली</ref>. तत्कालीन आंतरराष्ट्रीय राजकारणात नेहरूंच्या पुढाकाराखाली अमेरिकेस सलणारी भारताची काहीशी सोव्हियेट संघाकडे झुकलेली अलिप्ततावादी भूमिका आणि साम्यवादी चीनशी ताणत चाललेले संबंध या पार्श्वभूमीवर ह्या अमेरिकन मदतीकडे पाहिले गेले. शिवाय अमेरिकी अध्यक्ष आयसेनहोवर यांचे सीआयए गुप्तचरांच्या करवी तत्कालीन इराणाची लोकशाही सरकार उलथवण्याचे कारस्थानही भारतीय साशंकतेस कारणीभूत होते. {{संदर्भ हवा}}


ह्या आयात गव्हाच्या दर्जावर तसेच सोबत शिरकाव केलेल्या गाजरगवत तणामुळे हा गहू टिकेस पात्र ठरला.{{संदर्भ हवा}}
ह्या आयात गव्हाच्या दर्जावर तसेच सोबत शिरकाव केलेल्या गाजरगवत तणामुळे हा गहू टीकेस पात्र ठरला. या गव्हाच्या आयात कराराला पी.एल.८४ असे नाव आहे. हा गहू तांबड्या रंगाचा आणि अत्यंत निकृष्ट प्रतीचा होता. त्याचे अमेरिकेतले भरमसाट उत्पादन मुख्यत्वे डुकरांच्या अन्‍नासाठी होत असे, असे भारतात मानले जाई. करार संपला आणि अमेरिकेतून गहू येणेही बंद झाले, परंतु गव्हाबरोबर आलेल्या कॉंग्रेस ऊर्फ गाजर गवताच्या बियांमुळे उगवलेल्या तणामुळे आजही भारतातातली लाखो एकर जमीन व्यापली गेली आहे. {{संदर्भ हवा}}


==मुंबई संयुक्त महाराष्ट्रात विलीन करण्यास विरोध==
==मुंबई संयुक्त महाराष्ट्रात विलीन करण्यास विरोध==

२२:३५, १९ फेब्रुवारी २०१२ ची आवृत्ती

सदाशिव कानोजी पाटील, तथा स.का. पाटील, (इ.स. १९०१ - मृत्युदिनांक अज्ञात) हे मराठा, भारतीय राजकारणी होते. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सदस्य होते. इ.स. १९५७ ते इ.स. १९६७ या कालखंडात ते भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्री होते.

जीवन

पाटलांचा जन्म शेतकरी कुटुंबात झाला. सुरुवातीस पत्रकार म्हणून काम केल्यानंतर त्यांनी काँग्रेसमधून राजकारणात प्रवेश केला. मुंबईचे माजी महापौर, जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधींच्या (१९५७ ते १९६७ ) काळात ते भारतीय संघराज्याचे मंत्री होते.

खासदारकी आणि मंत्रिपद

तीन वेळा मुंबईचे खासदार म्हणून प्रतिनिधित्व केले. इ.स. १९६७च्या निवडणुकीत जॉर्ज फर्नांडीस यांनी त्यांचा पराभव केला.

अमेरिकेकडून अन्न आयात

केंद्रीय मंत्रिमंडळात अन्न आणि कृषिमंत्री पदाच्या काळात ऑगस्ट इ.स. १९६० मध्ये पडलेल्या दुष्काळ आणि अन्न तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर, स.का.पाटलांनी तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि मंत्रिमंडळ साशंक असतानाही, अमेरिकेकडून पुढील चार वर्षांच्या काळाकरिता १.३ अब्ज अमेरिकन डॉलर किमतीचा १.६ कोटी टन अमेरिकन गहू आणि १,०००,००० टन तांदूळ आयात करण्याचा निर्णय घेववून तत्कालीन अमेरिकी अध्यक्ष ड्वाईट आयसेनहोवर यांच्या सोबत द्विपक्षीय करार केला. इ.स. १९४७-१९५१ या काळातील मार्शल प्लाननंतर ही अमेरिकेने दुसर्‍या राष्ट्रास केलेली सर्वांत मोठी मदत होती. या करारान्वये भारताने रुपयात पैसे मोजावयाचे होते आणि या रकमेच्या ८५% रक्कम भारतास कर्ज आणि देणगीच्या स्वरूपात परत मिळणार होती.[१]. तत्कालीन आंतरराष्ट्रीय राजकारणात नेहरूंच्या पुढाकाराखाली अमेरिकेस सलणारी भारताची काहीशी सोव्हियेट संघाकडे झुकलेली अलिप्ततावादी भूमिका आणि साम्यवादी चीनशी ताणत चाललेले संबंध या पार्श्वभूमीवर ह्या अमेरिकन मदतीकडे पाहिले गेले. शिवाय अमेरिकी अध्यक्ष आयसेनहोवर यांचे सीआयए गुप्तचरांच्या करवी तत्कालीन इराणाची लोकशाही सरकार उलथवण्याचे कारस्थानही भारतीय साशंकतेस कारणीभूत होते. [ संदर्भ हवा ]

ह्या आयात गव्हाच्या दर्जावर तसेच सोबत शिरकाव केलेल्या गाजरगवत तणामुळे हा गहू टीकेस पात्र ठरला. या गव्हाच्या आयात कराराला पी.एल.८४ असे नाव आहे. हा गहू तांबड्या रंगाचा आणि अत्यंत निकृष्ट प्रतीचा होता. त्याचे अमेरिकेतले भरमसाट उत्पादन मुख्यत्वे डुकरांच्या अन्‍नासाठी होत असे, असे भारतात मानले जाई. करार संपला आणि अमेरिकेतून गहू येणेही बंद झाले, परंतु गव्हाबरोबर आलेल्या कॉंग्रेस ऊर्फ गाजर गवताच्या बियांमुळे उगवलेल्या तणामुळे आजही भारतातातली लाखो एकर जमीन व्यापली गेली आहे. [ संदर्भ हवा ]

मुंबई संयुक्त महाराष्ट्रात विलीन करण्यास विरोध

संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीस विरोध करून खासकरून मुंबई हे बहुसांस्कृतिक शहर आहे त्यामुळे महाराष्ट्रापासून वेगळे ठेवावे अशी तत्कालीन भाषिक आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर वादग्रस्त भूमिकेची मांडणी केली.[२][३]

संदर्भ

  1. ^ /0,9171,894869,00.html#ixzz0rHAHP5o9 मे १६, १९६०चा टाईम नियतकालिकाची आवृत्ती १९ जून इ.स. २०१० सकाळी ११.४० वाजता आंतरजालावर जशी दिसली
  2. ^ १५ नोव्हेंबर, इ.स. १९५५ लोकसभा चर्चेतील सहभाग
  3. ^ Guha, Ramachandra. The Hindu http://www.hinduonnet.com/thehindu/mag/2003/04/13/stories/2003041300240300.htm. 2008-11-12 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)