"पद्मिनी (स्त्रीविशेष)" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: भारतातल्या प्राचीन विद्वानांनी तारुण्य प्राप्त झालेल्या स्त्रि... |
(काही फरक नाही)
|
१७:०३, १४ सप्टेंबर २०११ ची आवृत्ती
भारतातल्या प्राचीन विद्वानांनी तारुण्य प्राप्त झालेल्या स्त्रियांचे त्यांच्या बोलण्या-चालण्या-वागण्यावरून आणि स्वभाव-प्रवृत्तीनुरूप चार प्रकार कल्पिले आहेत. त्यांतला पहिला प्रकार म्हणजे पद्मिनी. बाकीचे तीन प्रकार अनुक्रमे चित्रिणी, शंखिनी आणि हस्तिनी.
पद्मिनीला सयुज्यता असेही नाव आहे. सयुज्यता ही मोक्षाची पहिली पायरी समजली जाते. बाकीच्या तीन पायर्या अनुक्रमे समीप्यता, सरूपता व सलोकता.
पद्मिनीचे गुणविशेष : तिचा चेहरा नेहमी पूर्ण चंद्राप्रमाणे प्रफुल्लित असतो. तिचे मांसल शरीर सिरसासारखे किंवा मोहरीच्या फुलांसारखे मुलायम असते. त्वचा पातळ, नाजुक आणि पीतकमलासारखी गोरी असते. ती क्वचित सावळी असली तरी काळी कुळकुळीत नसते. तिच्या सावळा रंगाला पाऊस पाडायला उत्सुक असलेल्या ढगाच्या जांभळट रंगाची तारुण्याची झळाळी असते. तिचे तेजस्वी डोळे वासराच्या डोळ्यांसारखे सुरेख, रेखीव असून डोळ्याचे कोपरे लालसर असतात. तिचे उरोज घट्ट, भरलेले आणि उंचसर असतात. तिचा गळा शंखाकार असून नितळ आणि पारदर्शक असतो.