"आंदोलने आणि चौक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ३०: ओळ ३०:


==प्लास डी ला बॅस्टाइल चौक (पॅरिस-फ्रान्स)==
==प्लास डी ला बॅस्टाइल चौक (पॅरिस-फ्रान्स)==

परिसमधल्या या चौकाचे नाव पहिल्यांदा १४ जुलै १७६९ ला तिथे झालेल्या निदर्शनांमुळे प्रसिद्धीस आले. फ्रान्सच्या क्रांतीची सुरुवात याच चौकातून झाली. या चौकात तेव्हा असलेल्या एका किल्ल्यावरील बॅस्टाइलच्या तुरुंगावर आंदोलनकर्त्यांनी ताबा मिळवला आणि फ्रान्सच्या राजेशाहीविरुद्ध क्रांतीचा बिगुल फुंकला. या धामधुमीत किल्ला उद्ध्वस्त झाला. पण त्यानंतर याच चौकातून परत क्रांतीचे नारे उमटले आणि शेवटी १८३० साली फ्रान्सचा अधिपती दहावा चार्ल्स याला आपली गादी सोडावी लागली.

हा चौक पॅरिसच्या महानगरातील ४, ११ आणि १२ क्रमांकांच्या प्रभागांनी(वॉर्ड्‌जनी) वेढला गेला आहे. हा चौक आणि याच्या परिसराला अनेकदा नुसते '''बॅस्टाइल जुलै कॉलम''' असे म्हणतात. हा कॉलम डी ज्युलियेट-जुलै कोलम(स्तंभ) १८३०च्या क्रांतीचे स्मृतिचिन्ह आहे. इथल्या आणखी लक्षवेधी इमारतींमध्ये बॅस्टाइल नृत्यनाट्यगृह, बॅस्टाइल भूमिगत रेल्वे स्टेशन आणि सेंट मार्टिन कॅनॉलचा थोडा भाग येतो. जुने बॅस्टाइल रेल्वे स्टेशन १९८४ सालापर्यंत, आता जेथे नाट्यगृह आहे त्या जागेवर होते.

या चौकात अनेक कार्यक्रम होतात. रात्रीच्या वेळी, बॅस्टाइलचा ईशान्य कोपरा तेथे असलेल्या कॉफीगृहे, मद्यालये, नाइट क्लब्ज आणि समारंभ-दालनांनी गजबजलेला असतो. तरीही या प्लास डी ला बॅस्टाइल चौकाच्या ऐतिहासिक महत्त्वामुळे येथे अजूनही राजकीय स्वरूपाची निदर्शने होतात. २८ मार्च २००६ रोजी झालेली विशाल अ‍ॅन्टी सीपीई निदर्शने याच चौकात झाली होती.


==डिसेंब्रिस्ट्स चौक (सेंट पीटसबर्ग-रशिया)==
==डिसेंब्रिस्ट्स चौक (सेंट पीटसबर्ग-रशिया)==

२३:४३, ३० ऑगस्ट २०११ ची आवृत्ती

जगातले काही चौक आणि काही मैदाने आंदोलनांकरिता प्रसिद्ध आहेत. त्यांतली काही ही :

जालियानवाला बाग (अमृतसर-भारत)

१३ एप्रिल १९१९ या दिवशी जालियानवाला बाग येथे मैदानावर एक सभा झाली होती. त्या सभेचा उद्देश डॉ. सैफुद्दिन किचलू आणि डॉ. सत्यपाल यांच्या अटकेचा आणि रॉलेट अ‍ॅक्टचा विरोध करणे हा होता. सभा संपल्यावर सुमारे तासभर बैशाखी या सणानिमित्त जमलेले हजारो हिंदू, शीख आणि मुसलमान लोक एकमेकांना सणाच्या शुभेच्छा देत होते. अचानक तेथे जनरल डायर ६५ गुरखा आणि २५ बलुची सैनिकांना घेऊन दाखल झाला आणि त्या रायफलधारी सैनिकांना त्याने गोळीबाराचा आदेश दिला. १० ते १५ मिनिटांच्या आत गोळीबाराच्या ६५०० फैरी झाडल्या गेल्या. इंग्रज सरकारच्या आकडेवारीनुसार तेव्हा ३७९ जण मृत पावले आणि ११०० जखमी. भारतीय काँग्रेसने मृतांचा आकडा १५००हून अधिक आहे असे सांगितले.

आजादी चौक (तेहरान-इराण)

इराणच्या आजादी चौकात इ.स. १९७९ मध्ये इराणच्या शहाविरुद्ध हजारो माणसांनी जन-आंदोलन सुरू केले आणि अंती शहाची सत्ता संपुष्टात आली. त्यानंतर २०११ साली येथे परत लाखो लोक जमले आणि त्यांनी राष्ट्रपती महमूद अहमदीनेजाद यांच्या विरुद्ध निदर्शने केली. तूर्त राष्ट्रपती ही निदर्शने दडपून ठेवण्यात यशस्वी झाले आहेत. लोकांच्या मते राष्ट्रपती महमूद अहमदीनेजाद यांनी निवडणुकीमध्ये घॉटाळे करून ती जिंकली आहे.

तहरीर चौक (काहिरा-इजिप्त)

इजिप्तमधला काहिरा चौक हा मुळात इस्मालिया चौक या नावाने ओळखला जात असे. इजिप्तमधल्या इ.स. १९१९च्या क्रांतीनंतर लोक या चौकाला तहरीर चौक(म्हणजे मुक्तिचौक) असे म्हणू लागले. मात्र इ.स.१९५२ पर्यंत हे नाव अधिकृत झालेले नव्हते. राष्ट्रपती होस्नी मुबारक यांच्या विरोधात सन २०११ मध्ये जो उठाव झाला त्यावेळी निदर्शनांच्या केन्द्रस्थानी हा तहरीर चौक होता. २५ जानेवारी २०११ रोजी या चौकात पन्नास हजाराहून अधिक लोकांनी घेराव केला. पुढील पाच दिवसात ही संख्या एक लाखावर गेली. १४ ऑक्टोबर १९८१ पासून म्हणजे ३० वर्षांपासून राष्ट्रपतीच्या गादीवर असलेले होस्नी मुबारक यांना तहरीर चौकातून सुरू झालेल्या या सतत १८ दिवसांच्या निदर्शनांनंतर अखेरीस पदत्याग करावा लागला. होस्नी मुबारक यांच्या कारकीर्दीत भ्रष्टाचार आणि बेरोजगारी इतकी वाढली होती की लोकांना त्यांची कारकीर्द संपवावी लागली.

तिआनमेन चौक(पेकिंग-चीन)

रामलीला मैदान (दिल्ली-भारत)

ऑगस्ट क्रांति मैदान(गोवालिया टँक) (मुंबई-भारत)

युनियन स्क्वेअर (न्यूयॉर्क-अमेरिका)

फोर्ट समरच्या पाडावानंतर अमेरिकेत नागरी युद्ध सुरू झाले. त्यानंत सुयोग्य सरकार बनवण्यासाठीचा विचार करण्याकरिता या युनियन चौकात २० एप्रिल १८६१ रोजी एक 'मास मीटिंग' झाली होती. त्या काळात या सभेला तब्बल एक लाख लोक हजर होते. अजूनही या चौकात निदर्शने आणि भाषणे होतात. ९/११ च्या विमान हल्ल्यांनंतर पुढे कित्येक आठवडे अमेरिकेचे नागरिक डोळ्यांत अश्रू आणि हातांत मेणबत्त्या घेऊन मृतात्म्यांना श्रद्धांजली देण्याकरिता न्यूयॉर्कमधल्या या युनियन चौकात येत होते.

व्हॅन्सेस्लास चौक (प्राग-झेकोस्लाव्हाकिया)

चेक गणराज्यातल्या प्राग शहरातील व्हॅन्सेस्लास चौक हा तिथे झालेल्या जनआंदोलनांसाठी प्रसिद्ध आहे. इथे झालेल्या आंदोलनांनी काही वेळा इतिहास बदलला आहे. जेव्हा पूर्व युरोपातील साम्यवादी राजसत्ता धडाधड कोसळत होत्या, तेव्हा या मैदानावर इ.स.१९८९ साली लाखो लोकांनी जमून देशावरच्या साम्यवादी राजवटीचा अंत घडवून आणला. ही राज्यक्रांती व्हेलव्हेट रिव्हॉल्युशन(मखमल क्रांती) या नावाने ओळखली जाते.

आजसुद्धा या मैदानावर अनेक मोठमोठी निदर्शने होतात.

प्लास डी ला बॅस्टाइल चौक (पॅरिस-फ्रान्स)

परिसमधल्या या चौकाचे नाव पहिल्यांदा १४ जुलै १७६९ ला तिथे झालेल्या निदर्शनांमुळे प्रसिद्धीस आले. फ्रान्सच्या क्रांतीची सुरुवात याच चौकातून झाली. या चौकात तेव्हा असलेल्या एका किल्ल्यावरील बॅस्टाइलच्या तुरुंगावर आंदोलनकर्त्यांनी ताबा मिळवला आणि फ्रान्सच्या राजेशाहीविरुद्ध क्रांतीचा बिगुल फुंकला. या धामधुमीत किल्ला उद्ध्वस्त झाला. पण त्यानंतर याच चौकातून परत क्रांतीचे नारे उमटले आणि शेवटी १८३० साली फ्रान्सचा अधिपती दहावा चार्ल्स याला आपली गादी सोडावी लागली.

हा चौक पॅरिसच्या महानगरातील ४, ११ आणि १२ क्रमांकांच्या प्रभागांनी(वॉर्ड्‌जनी) वेढला गेला आहे. हा चौक आणि याच्या परिसराला अनेकदा नुसते बॅस्टाइल जुलै कॉलम असे म्हणतात. हा कॉलम डी ज्युलियेट-जुलै कोलम(स्तंभ) १८३०च्या क्रांतीचे स्मृतिचिन्ह आहे. इथल्या आणखी लक्षवेधी इमारतींमध्ये बॅस्टाइल नृत्यनाट्यगृह, बॅस्टाइल भूमिगत रेल्वे स्टेशन आणि सेंट मार्टिन कॅनॉलचा थोडा भाग येतो. जुने बॅस्टाइल रेल्वे स्टेशन १९८४ सालापर्यंत, आता जेथे नाट्यगृह आहे त्या जागेवर होते.

या चौकात अनेक कार्यक्रम होतात. रात्रीच्या वेळी, बॅस्टाइलचा ईशान्य कोपरा तेथे असलेल्या कॉफीगृहे, मद्यालये, नाइट क्लब्ज आणि समारंभ-दालनांनी गजबजलेला असतो. तरीही या प्लास डी ला बॅस्टाइल चौकाच्या ऐतिहासिक महत्त्वामुळे येथे अजूनही राजकीय स्वरूपाची निदर्शने होतात. २८ मार्च २००६ रोजी झालेली विशाल अ‍ॅन्टी सीपीई निदर्शने याच चौकात झाली होती.

डिसेंब्रिस्ट्स चौक (सेंट पीटसबर्ग-रशिया)

या मैदानाचे मूळ नाव सेंट पीटर्सबग प्लाझा. १९१७ मधील बोल्शेव्हिक क्रांतीनंतर याचे नाव बदलून डिसेंब्रिस्ट्स चौक झाले. त्या क्रांतीमध्ये रशियन राज्यकर्ता पहिला झार निकोलस याला विरोध करण्यासाठी आणि कारभारात सुधारणा मागण्यासाठी र्मैदानात जमून निदर्शने करणार्‍यांत अनेक लष्करी अधिकारी होते. डिसेंबर १८२५ च्या या बंडामध्ये जवळजवळ ३००० लोक सहभागी झाले होते. सरकारने पाच लोकांना फासावर चढवले, शेकडोंना सैबेरियातील तुरुंगांत डांबले, आणि हे बंड तात्पुरते थंड केले.

या चौकाचे नाव तिथे चालणार्‍या चळवळींनुसार अनेकदा बदलण्यात आले आहे.

ट्रॅफेलगार चौक (लंडन-इंग्लंड)

इंडिपेन्डन्स चौक (कीव-युक्रेन)

इ.स. २००४ च्या निवडणुकांत युक्रेनचा नेता म्हणून व्हिक्टर यानकोव्हिच निवडला गेला. त्या वेळी पाश्चिमात्य विचारसरणीचे विरोधी पक्षाचे नेते कीव यांच्या समर्थनासाठी या इंडिपेन्डन्स चौकात हजारो लोक जमा झाले होते. त्यांचे म्हणणे होते की या निवडणुकांत अनेक गैरप्रकार झाले आहेत, आणि म्हणून त्या रद्द करून नवीन निवडणुका व्हाव्यात. निदर्शने करणार्‍या लोकांनी नारिंगी रंगाचे कपडे घातले होते म्हणून या क्रांतीला ऑरेंज रिव्हॉल्युशन(नारिंगी क्रांती) म्हटले जाते. सरतेशेवटी, युक्रेनच्या कोर्टाने मतदानामध्ये सिद्ध झालेल्या घोटाळेबाजीच्या कारणास्तव त्या निवडणुका रद्दबातल घोषित केल्या.

कामगार मैदान (परळ, मुंबई-भारत)

शनिवारवाडा (पुणे-भारत)

आझाद मैदान (मुंबई-भारत)

काळा घोडा (मुंबई-भारत)

शिवाजी पार्क (दादर, मुंबई-भारत)

फ्लोरा फाउंटन, आता हुतात्मा चौक (मुंबई-भारत)

हाइड पार्क (लंडन-इंग्लंड)