आंदोलने आणि चौक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Commons-emblem-notice.svg
हा लेख/हे पान अवर्गीकृत आहे.
कृपया या लेखाचे/पानाचे वर्गीकरण करण्यास मदत करा जेणेकरून हा लेख/हे पान संबंधित विषयाच्या सूचीमध्ये समाविष्ट होईल. वर्गीकरणानंतर हा संदेश काढून टाकावा अशी विनंती करण्यात येते.


जगातले काही चौक आणि काही मैदाने आंदोलनांकरिता प्रसिद्ध आहेत. त्यांतली काही ही :

ऑगस्ट क्रांति मैदान(गोवालिया टॅंक) (मुंबई-भारत)[संपादन]

ऐतिहासिक मैदान

आजादी चौक (तेहरान-इराण)[संपादन]

इराणच्या आजादी चौकात इ.स. १९७९ मध्ये इराणच्या शहाविरुद्ध हजारो माणसांनी जन-आंदोलन सुरू केले आणि अंती शहाची सत्ता संपुष्टात आली. त्यानंतर २०११ साली येथे परत लाखो लोक जमले आणि त्यांनी राष्ट्रपती महमूद अहमदीनेजाद यांच्या विरुद्ध निदर्शने केली. तूर्त राष्ट्रपती ही निदर्शने दडपून ठेवण्यात यशस्वी झाले आहेत. लोकांच्या मते राष्ट्रपती महमूद अहमदीनेजाद यांनी निवडणुकीमध्ये घोटाळे करून ती जिंकली आहे.

आझाद मैदान (मुंबई-भारत)[संपादन]

इंडिपेन्डन्स चौक (कीव-युक्रेन)[संपादन]

इ.स. २००४ च्या निवडणुकांत युक्रेनचा नेता म्हणून व्हिक्टर यानकोव्हिच निवडला गेला. त्या वेळी पाश्चिमात्य विचारसरणीचे विरोधी पक्षाचे नेते कीव यांच्या समर्थनासाठी या इंडिपेन्डन्स चौकात हजारो लोक जमा झाले होते. त्यांचे म्हणणे होते की या निवडणुकांत अनेक गैरप्रकार झाले आहेत, आणि म्हणून त्या रद्द करून नवीन निवडणुका व्हाव्यात. निदर्शने करणाऱ्या लोकांनी नारिंगी रंगाचे कपडे घातले होते म्हणून या क्रांतीला ऑरेंज रिव्हॉल्युशन(नारिंगी क्रांती) म्हटले जाते. सरतेशेवटी, युक्रेनच्या कोर्टाने मतदानामध्ये सिद्ध झालेल्या घोटाळेबाजीच्या कारणास्तव त्या निवडणुका रद्दबातल घोषित केल्या.

कामगार मैदान (परळ, मुंबई-भारत)[संपादन]

काळा घोडा (मुंबई-भारत)[संपादन]

जालियानवाला बाग (अमृतसर-भारत)[संपादन]

१३ एप्रिल १९१९ या दिवशी जालियानवाला बाग येथे मैदानावर एक सभा झाली होती. त्या सभेचा उद्देश डॉ. सैफुद्दिन किचलू आणि डॉ. सत्यपाल यांच्या अटकेचा आणि रॉलेट अ‍ॅक्टचा विरोध करणे हा होता. सभा संपल्यावर सुमारे तासभर बैशाखी या सणानिमित्त जमलेले हजारो हिंदू, शीख आणि मुसलमान लोक एकमेकांना सणाच्या शुभेच्छा देत होते. अचानक तेथे जनरल डायर ६५ गुरखा आणि २५ बलुची सैनिकांना घेऊन दाखल झाला आणि त्या रायफलधारी सैनिकांना त्याने गोळीबाराचा आदेश दिला. १० ते १५ मिनिटांच्या आत गोळीबाराच्या ६५०० फैरी झाडल्या गेल्या. इंग्रज सरकारच्या आकडेवारीनुसार तेव्हा ३७९ जण मृत पावले आणि ११०० जखमी. भारतीय कॉंग्रेसने मृतांचा आकडा १५००हून अधिक आहे असे सांगितले.

इसवी सन १९१५ साली रविंद्रनाथ टागोरांना मिळालेली सर ही पदवी, त्यांनी जालियनवाला बागेत केलेल्या हत्याकांडाच्या निषेधार्थ इ.स.१९१९ मध्ये परत केली.

ट्रॅफेलगार चौक (लंडन-इंग्लंड)[संपादन]

लंडन शहराच्या मध्यभागी असलेल्या या चौकात एकोणिसाव्या शतकात लोक समारंभ आणि निदर्शने या दोन्ही गोष्टींसाठी जमा होत असत. १९ नोव्हेंबर १८८७ रोजी येथे चार हजारच्या संख्येत असलेल्या पोलिसांनी सुमारे दहा हजार निदर्शकांवर लाठीमार आणि गोळीबार केला होता, त्यांत कित्येक लोकांचा मृत्यू झाला व अनेक जखमी झाले. निदर्शनांमध्ये बेरोजगार, समाजवादी, आयर्लंडच्या स्वातंत्र्याची मागणी करणारे, काही उदारमतवादी आणि अन्य असंतुष्ट लोकांनी भाग घेतला होता. इ.स. २०१०मध्ये विद्यापीठांत शुल्कवाढीविरुद्ध झालेली निदर्शने याच ट्रॅफेलगार चौकात झाली होती.

डिसेंब्रिस्ट्स चौक (सेंट पीटसबर्ग-रशिया)[संपादन]

या मैदानाचे मूळ नाव सेंट पीटर्सबर्ग प्लाझा. १९१७मधील बोल्शेव्हिक क्रांतीनंतर याचे नाव बदलून डिसेंब्रिस्ट्स चौक झाले. त्या क्रांतीमध्ये रशियन राज्यकर्ता पहिला झार निकोलस याला विरोध करण्यासाठी आणि कारभारात सुधारणा मागण्यासाठी र्मैदानात जमून निदर्शने करणाऱ्यांत अनेक लष्करी अधिकारी होते. डिसेंबर १८२५च्या या बंडामध्ये जवळजवळ ३००० लोक सहभागी झाले होते. सरकारने पाच लोकांना फासावर चढवले, शेकडोंना सैबेरियातील तुरुंगांत डांबले, आणि हे बंड तात्पुरते थंड केले.

या चौकाचे नाव तिथे चालणाऱ्या चळवळींनुसार अनेकदा बदलण्यात आले आहे.

तहरीर चौक (काहिरा-इजिप्त)[संपादन]

इजिप्तमधला काहिरा चौक हा मुळात इस्मालिया चौक या नावाने ओळखला जात असे. इजिप्तमधल्या इ.स. १९१९च्या क्रांतीनंतर लोक या चौकाला तहरीर चौक(म्हणजे मुक्तिचौक) असे म्हणू लागले. मात्र इ.स.१९५२ पर्यंत हे नाव अधिकृत झालेले नव्हते. राष्ट्रपती होस्नी मुबारक यांच्या विरोधात सन २०११ मध्ये जो उठाव झाला त्यावेळी निदर्शनांच्या केन्द्रस्थानी हा तहरीर चौक होता. २५ जानेवारी २०११ रोजी या चौकात पन्नास हजाराहून अधिक लोकांनी घेराव केला. पुढील पाच दिवसात ही संख्या एक लाखावर गेली. १४ ऑक्टोबर १९८१ पासून म्हणजे ३० वर्षांपासून राष्ट्रपतीच्या गादीवर असलेले होस्नी मुबारक यांना तहरीर चौकातून सुरू झालेल्या या सतत १८ दिवसांच्या निदर्शनांनंतर अखेरीस पदत्याग करावा लागला. होस्नी मुबारक यांच्या कारकीर्दीत भ्रष्टाचार आणि बेरोजगारी इतकी वाढली होती की लोकांना त्यांची कारकीर्द संपवावी लागली.

तिआनमेन चौक(पेकिंग-चीन)[संपादन]

पेकिंगच्या विद्यार्थ्यांनी आर्थिक सुधारणा आणि राजकीय उदारमतवाद यांसाठी १५ एप्रिल १९८९ रोजी या चौकात निदर्शने केली होती. या निदर्शनांनंतर पीपल्स लिबरेशन आर्मीच्या सैनिकांनी रणगाड्यांमधून येऊन केलेल्या हल्ल्यामुळे हजारो लोकांचा मृत्यू झाला. या प्रसंगाला चार जूनची दुर्घटना किंवा तिआनमेन हत्याकांड म्हणून ओळखले जाते. चीनच्या कम्युनिस्ट पार्टीचे माजी जनरल सेक्रेटरी हू यो बांग या हल्ल्यात शहीद झाले. ते राजकीय उदारमतवादाचे एक समर्थक होते. त्यांच्यावरच्या अंतिम संस्कारासाठी तिआनमेन चौकात एक लाख लोक जमा झाले होते. त्यानंतर पेकिंगच्या बाहेरही निदर्शनांना सुरुवात झाली. चीनच्या सरकारने अनेक लोकांची आणि त्यांच्या नेत्यांची धरपकड करून हे बंड मोडून काढले.

प्लास डी ला बॅस्टाइल चौक (पॅरिस-फ्रान्स)[संपादन]

परिसमधल्या या चौकाचे नाव पहिल्यांदा १४ जुलै १७६९ला तिथे झालेल्या निदर्शनांमुळे प्रसिद्धीस आले. फ्रान्सच्या क्रांतीची सुरुवात याच चौकातून झाली. या चौकात तेव्हा असलेल्या एका किल्ल्यावरील बॅस्टाइलच्या तुरुंगावर आंदोलनकर्त्यांनी ताबा मिळवला आणि फ्रान्सच्या राजेशाहीविरुद्ध क्रांतीचा बिगुल फुंकला. या धामधुमीत किल्ला उद्ध्वस्त झाला. पण त्यानंतर याच चौकातून परत क्रांतीचे नारे उमटले आणि शेवटी १८३० साली फ्रान्सचा अधिपती दहावा चार्ल्स याला आपली गादी सोडावी लागली.

हा चौक पॅरिसच्या महानगरातील ४, ११ आणि १२ क्रमांकांच्या प्रभागांनी(वॉर्ड्‌जनी) वेढला गेला आहे. हा चौक आणि याच्या परिसराला अनेकदा नुसते बॅस्टाइल जुलै कॉलम असे म्हणतात. हा कॉलम डी ज्युलियेट-जुलै कॉलम(स्तंभ) १८३०च्या क्रांतीचे स्मृतिचिन्ह आहे. इथल्या आणखी लक्षवेधी इमारतींमध्ये बॅस्टाइल नृत्यनाट्यगृह, बॅस्टाइल भूमिगत रेल्वे स्टेशन आणि सेंट मार्टिन कॅनॉलचा थोडासा भाग येतो. जुने बॅस्टाइल रेल्वे स्टेशन १९८४ सालापर्यंत, आता जेथे नाट्यगृह आहे त्या जागेवर होते.

या चौकात अनेक कार्यक्रम होतात. रात्रीच्या वेळी, बॅस्टाइलचा ईशान्य कोपरा तेथे असलेल्या कॉफीगृहे, मद्यालये, नाइट क्लब्ज आणि समारंभ-दालनांनी गजबजलेला असतो. तरीही या प्लास डी ला बॅस्टाइल चौकाच्या ऐतिहासिक महत्त्वामुळे येथे अजूनही राजकीय स्वरूपाची निदर्शने होतात. ७ फेब्रुवारी ते २८ मार्च २००६ दरम्यान झालेली विशाल अ‍ॅन्टि सीपीई(Contrat de première embauche)(दि फर्स्ट जॉब कॉन्ट्रॅक्ट) निदर्शनांची सुरुवात याच चौकापासून झाली होती त्या वेळी दोन लाख ते चार लाख तरुण कामगार निदर्शनांसाठी रस्त्यावर उतरले होते. पॅरिसमधल्या एकूण १८७ ठिकाणी ही निदर्शने झाली.

फ्लोरा फाउंटन, आता हुतात्मा चौक (मुंबई-भारत)[संपादन]

युनियन स्क्वेअर (न्यूयॉर्क-अमेरिका)[संपादन]

फोर्ट समरच्या पाडावानंतर अमेरिकेत नागरी युद्ध सुरू झाले. त्यानंत सुयोग्य सरकार बनवण्यासाठीचा विचार करण्याकरिता या युनियन चौकात २० एप्रिल १८६१ रोजी एक 'मास मीटिंग' झाली होती. त्या काळात या सभेला तब्बल एक लाख लोक हजर होते. अजूनही या चौकात निदर्शने आणि भाषणे होतात. ९/११ च्या विमान हल्ल्यांनंतर पुढे कित्येक आठवडे अमेरिकेचे नागरिक डोळ्यांत अश्रू आणि हातांत मेणबत्त्या घेऊन मृतात्म्यांना श्रद्धांजली देण्याकरिता न्यूयॉर्कमधल्या या युनियन चौकात येत होते.

रामलीला मैदान (दिल्ली-भारत)[संपादन]

व्हॅन्सेस्लास चौक (प्राग-झेकोस्लाव्हाकिया)[संपादन]

चेक गणराज्यातल्या प्राग शहरातील व्हॅन्सेस्लास चौक हा तिथे झालेल्या जनआंदोलनांसाठी प्रसिद्ध आहे. इथे झालेल्या आंदोलनांनी काही वेळा इतिहास बदलला आहे. जेव्हा पूर्व युरोपातील साम्यवादी राजसत्ता धडाधड कोसळत होत्या, तेव्हा या मैदानावर इ.स.१९८९ साली लाखो लोकांनी जमून देशावरच्या साम्यवादी राजवटीचा अंत घडवून आणला. ही राज्यक्रांती व्हेलव्हेट रिव्हॉल्युशन(मखमल क्रांती) या नावाने ओळखली जाते.

आजसुद्धा या मैदानावर अनेक मोठमोठी निदर्शने होतात.

शनिवारवाडा (पुणे-भारत)[संपादन]

शिवाजी पार्क (दादर, मुंबई-भारत)[संपादन]

हाइड पार्क (लंडन-इंग्लंड)[संपादन]