"आंदोलने आणि चौक" च्या विविध आवृत्यांमधील फरक
ओळ १०: | ओळ १०: | ||
==तहरीर चौक (काहिरा-इजिप्त)== |
==तहरीर चौक (काहिरा-इजिप्त)== |
||
इजिप्तमधला काहिरा चौक हा मुळात इस्मालिया चौक या नावाने ओळखला जात असे. इजिप्तमधल्या इ.स. १९१९च्या क्रांतीनंतर लोक या चौकाला तहरीर चौक(म्हणजे मुक्तिचौक) असे म्हणू लागले. मात्र इ.स.१९५२ पर्यंत हे नाव अधिकृत झालेले नव्हते. राष्ट्रपती होस्नी मुबारक यांच्या विरोधात सन २०११ मध्ये जो उठाव झाला त्यावेळी निदर्शनांच्या केन्द्रस्थानी हा तहरीर चौक होता. २५ जानेवारी २०११ रोजी या चौकात पन्नास हजाराहून अधिक लोकांनी घेराव केला. पुढील पाच दिवसात ही संख्या एक लाखावर गेली. १४ ऑक्टोबर १९८१ पासून म्हणजे ३० वर्षांपासून राष्ट्रपतीच्या गादीवर असलेले होस्नी मुबारक यांना तहरीर चौकातून सुरू झालेल्या या सतत १८ दिवसांच्या निदर्शनांनंतर अखेरीस पदत्याग करावा लागला. होस्नी मुबारक यांच्या कारकीर्दीत भ्रष्टाचार आणि बेरोजगारी इतकी वाढली होती की लोकांना त्यांची कारकीर्द संपवावी लागली. |
|||
==तिआनमेन चौक(पेकिंग-चीन)== |
==तिआनमेन चौक(पेकिंग-चीन)== |
१५:३०, २३ ऑगस्ट २०११ ची आवृत्ती
जगातले काही चौक आणि काही मैदाने आंदोलनांकरिता प्रसिद्ध आहेत. त्यांतली काही ही :
जालियानवाला बाग (अमृतसर-भारत)
१३ एप्रिल १९१९ या दिवशी जालियानवाला बाग येथे मैदानावर एक सभा झाली होती. त्या सभेचा उद्देश डॉ. सैफुद्दिन किचलू आणि डॉ. सत्यपाल यांच्या अटकेचा आणि रॉलेट अॅक्टचा विरोध करणे हा होता. सभा संपल्यावर सुमारे तासभर बैशाखी या सणानिमित्त जमलेले हजारो हिंदू, शीख आणि मुसलमान लोक एकमेकांना सणाच्या शुभेच्छा देत होते. अचानक तेथे जनरल डायर ६५ गुरखा आणि २५ बलुची सैनिकांना घेऊन दाखल झाला आणि त्या रायफलधारी सैनिकांना त्याने गोळीबाराचा आदेश दिला. १० ते १५ मिनिटांच्या आत गोळीबाराच्या ६५०० फैरी झाडल्या गेल्या. इंग्रज सरकारच्या आकडेवारीनुसार तेव्हा ३७९ जण मृत पावले आणि ११०० जखमी. भारतीय काँग्रेसने मृतांचा आकडा १५००हून अधिक आहे असे सांगितले.
आजादी चौक (तेहरान-इराण)
इराणच्या आजादी चौकात इ.स. १९७९ मध्ये इराणच्या शहाविरुद्ध हजारो माणसांनी जन-आंदोलन सुरू केले आणि अंती शहाची सत्ता संपुष्टात आली. त्यानंतर २०११ साली येथे परत लाखो लोक जमले आणि त्यांनी राष्ट्रपती महमूद अहमदीनेजाद यांच्या विरुद्ध निदर्शने केली. तूर्त राष्ट्रपती ही निदर्शने दडपून ठेवण्यात यशस्वी झाले आहेत. लोकांच्या मते राष्ट्रपती महमूद अहमदीनेजाद यांनी निवडणुकीमध्ये घॉटाळे करून ती जिंकली आहे.
तहरीर चौक (काहिरा-इजिप्त)
इजिप्तमधला काहिरा चौक हा मुळात इस्मालिया चौक या नावाने ओळखला जात असे. इजिप्तमधल्या इ.स. १९१९च्या क्रांतीनंतर लोक या चौकाला तहरीर चौक(म्हणजे मुक्तिचौक) असे म्हणू लागले. मात्र इ.स.१९५२ पर्यंत हे नाव अधिकृत झालेले नव्हते. राष्ट्रपती होस्नी मुबारक यांच्या विरोधात सन २०११ मध्ये जो उठाव झाला त्यावेळी निदर्शनांच्या केन्द्रस्थानी हा तहरीर चौक होता. २५ जानेवारी २०११ रोजी या चौकात पन्नास हजाराहून अधिक लोकांनी घेराव केला. पुढील पाच दिवसात ही संख्या एक लाखावर गेली. १४ ऑक्टोबर १९८१ पासून म्हणजे ३० वर्षांपासून राष्ट्रपतीच्या गादीवर असलेले होस्नी मुबारक यांना तहरीर चौकातून सुरू झालेल्या या सतत १८ दिवसांच्या निदर्शनांनंतर अखेरीस पदत्याग करावा लागला. होस्नी मुबारक यांच्या कारकीर्दीत भ्रष्टाचार आणि बेरोजगारी इतकी वाढली होती की लोकांना त्यांची कारकीर्द संपवावी लागली.