"रामचंद्र द्विवेदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
V.narsikar (चर्चा | योगदान) नवीन पान: जुन्या काळातील एक चित्रपट गीतलेखक. {{विस्तार}} [[वर्ग:भारतीय गीतले... |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
<big>कवि प्रदीप</big>: संपूर्ण नांव : रामचंद्र द्विवेदी; जन्मः ६ फेब्रुवारी १९१५; मृत्यू : ११ डिसेंबर १९९८, हे अलीकडच्या काळात होऊन गेलेले एक चित्रपट [[गीतलेखक]] आणि गायक होते. त्यांचा जन्म मध्य प्रदेशमधील बडनगर येथे झाला होता. दुसर्या महायुद्धाच्या काळात हिमांशु राय आणि देविका रानी यांच्या बाँम्बे टॉकीजची सूत्रे शशधर मुकर्जींच्या हातात गेली. शशधर मुखर्जी हे प्रतिभा पारखण्यात उस्ताद होते. त्यांनी कवी प्रदीप यांना आमंत्रित करून त्यांच्याकडून [[किस्मत]], [[कंगन]], [[बंधन]], [[झूला]] आदी चित्रपटांची गीते लिहवून घेतली. ब्रिटिशांच्या चित्रपट समीक्षण मंडळाच्या डोळ्यात धूळ फेकणारे प्रदीप यांचे "दूर हटो ये दुनियावाले, हिदुस्तान हमारा है" हे किस्मतमधील गीत तुफान गाजले. बहुधा त्या वेळी लंडनमध्ये होणार्या बाँबहल्ल्यांमुळे इंग्रजांचे सेन्सॉर बोर्डाच्या कामकाजात लक्ष नव्हते. |
|||
जुन्या काळातील एक चित्रपट [[गीतलेखक]]. |
|||
कवी प्रदीप यांनी कबीर आणि गालिब वाचले होते आणि शैलेंद्र आणि साहिर लुधियानवी यांच्या काव्याशी ते चांगले परिचित होते. पण प्रदीप यांचा पिंड अस्सल भारतीय होता. |
|||
चिनी आक्रमणानंतर लता मंगेशकरांनी गायलेले त्यांच्या "ऐ मेरे वतन के लोगो"ने नेहरूंच्या डोळ्यात पाणी आणले. कारगील युद्धाच्या थोडेच दिवस आधी कवी प्रदीप निधन पावले होते. |
|||
कवी प्रदीप यांनी "ए मेरे वतन के लोगो"बद्दल मिळणार्या आपल्या बिदागीचा अर्धा हिस्सा युद्धातील विधवांच्या संस्थेला देण्यासाठी गीतमुद्रण कंपनीशी करार केला होता. कंपनीने करार पाळला नाही, आणि शेवटी प्रदीप यांच्या कन्येने दीर्घकाल कायदेशीर लढाई लढून तो हिस्सा युद्धविधवांसाठी काम करणार्या संस्थेला मिळवून दिला. |
|||
त्यांची अन्य गीते : |
|||
* हम लाएं हैं तूफान से कश्ती निकाल के (चित्रपट : जागृति) |
|||
* पिंजडे के पंछी रे, तेरा दर्द न नाने कोय (चित्रपटः ......., गायकः प्रदीप) |
|||
* देख तेरे संसार की हाल क्या हो गयी भगवान, कितना बदल गया इन्सान (चित्रपट : नास्तिक, गायक : प्रदीप) |
|||
{{विस्तार}} |
{{विस्तार}} |
१२:०३, २१ ऑगस्ट २०११ ची आवृत्ती
कवि प्रदीप: संपूर्ण नांव : रामचंद्र द्विवेदी; जन्मः ६ फेब्रुवारी १९१५; मृत्यू : ११ डिसेंबर १९९८, हे अलीकडच्या काळात होऊन गेलेले एक चित्रपट गीतलेखक आणि गायक होते. त्यांचा जन्म मध्य प्रदेशमधील बडनगर येथे झाला होता. दुसर्या महायुद्धाच्या काळात हिमांशु राय आणि देविका रानी यांच्या बाँम्बे टॉकीजची सूत्रे शशधर मुकर्जींच्या हातात गेली. शशधर मुखर्जी हे प्रतिभा पारखण्यात उस्ताद होते. त्यांनी कवी प्रदीप यांना आमंत्रित करून त्यांच्याकडून किस्मत, कंगन, बंधन, झूला आदी चित्रपटांची गीते लिहवून घेतली. ब्रिटिशांच्या चित्रपट समीक्षण मंडळाच्या डोळ्यात धूळ फेकणारे प्रदीप यांचे "दूर हटो ये दुनियावाले, हिदुस्तान हमारा है" हे किस्मतमधील गीत तुफान गाजले. बहुधा त्या वेळी लंडनमध्ये होणार्या बाँबहल्ल्यांमुळे इंग्रजांचे सेन्सॉर बोर्डाच्या कामकाजात लक्ष नव्हते.
कवी प्रदीप यांनी कबीर आणि गालिब वाचले होते आणि शैलेंद्र आणि साहिर लुधियानवी यांच्या काव्याशी ते चांगले परिचित होते. पण प्रदीप यांचा पिंड अस्सल भारतीय होता. चिनी आक्रमणानंतर लता मंगेशकरांनी गायलेले त्यांच्या "ऐ मेरे वतन के लोगो"ने नेहरूंच्या डोळ्यात पाणी आणले. कारगील युद्धाच्या थोडेच दिवस आधी कवी प्रदीप निधन पावले होते.
कवी प्रदीप यांनी "ए मेरे वतन के लोगो"बद्दल मिळणार्या आपल्या बिदागीचा अर्धा हिस्सा युद्धातील विधवांच्या संस्थेला देण्यासाठी गीतमुद्रण कंपनीशी करार केला होता. कंपनीने करार पाळला नाही, आणि शेवटी प्रदीप यांच्या कन्येने दीर्घकाल कायदेशीर लढाई लढून तो हिस्सा युद्धविधवांसाठी काम करणार्या संस्थेला मिळवून दिला.
त्यांची अन्य गीते :
- हम लाएं हैं तूफान से कश्ती निकाल के (चित्रपट : जागृति)
- पिंजडे के पंछी रे, तेरा दर्द न नाने कोय (चित्रपटः ......., गायकः प्रदीप)
- देख तेरे संसार की हाल क्या हो गयी भगवान, कितना बदल गया इन्सान (चित्रपट : नास्तिक, गायक : प्रदीप)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |