"भारतीय आडनावे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
पिळणकर
(चर्चा | योगदान)
ओळ ८: ओळ ८:
[[महाराष्ट्र]] आणि [[गुजरात]] राज्यांतील नामकरण पद्धतीमध्ये मधले नाव वडिलांचे किंवा पतीचे ठेवले जाते. उदाहारण: [[सचिन तेंडुलकर|सचिन रमेश तेंडुलकर]] या क्रिकेटपटूच्या नावातील पहिले नाव "सचिन", मधले नाव "रमेश" हे वडिलांचे नाव तर "तेंडुलकर" हे आडनाव आहे.
[[महाराष्ट्र]] आणि [[गुजरात]] राज्यांतील नामकरण पद्धतीमध्ये मधले नाव वडिलांचे किंवा पतीचे ठेवले जाते. उदाहारण: [[सचिन तेंडुलकर|सचिन रमेश तेंडुलकर]] या क्रिकेटपटूच्या नावातील पहिले नाव "सचिन", मधले नाव "रमेश" हे वडिलांचे नाव तर "तेंडुलकर" हे आडनाव आहे.


परंपरेनुसार स्त्रिया लग्नानंतर पतीचे नाव व आडनाव वापरतात. महाराष्ट्रात नातवाला आजोबांचे नाव देण्याची पद्धत होती/आहे. गुजरातमध्ये नावानंतर भाई (पुरुषांसाठी) किंवा बेन (स्त्रियांसाठी) लावण्याची पद्धत आहे. महाराष्ट्रात काही समाजात पुरुषांच्या नावांना राव तर स्त्रियांच्या नावांनंतर बाई/ताई लावले जाते.
स्त्रिया लग्नानंतर परंपरेनुसार पतीचे नाव व आडनाव वापरतात. महाराष्ट्रात नातवाला आजोबांचे नाव देण्याची पद्धत एकेकाळी होती. गुजरातमध्ये नावानंतर भाई (पुरुषांसाठी) किंवा बेन (स्त्रियांसाठी) लावण्याची पद्धत आहे. महाराष्ट्रात काही समाजात पुरुषांच्या नावांना राव तर स्त्रियांच्या नावांनंतर बाई/ताई लावले जाते.


मराठीतील कर-अंती आडनावे गावांच्या नावावरून पडली आहेत. माडगुळकर ([[माडगुळ]] गावावरून, वेंगसरकर, गावसकर, बांदेकर वगैरे. बाकीची नेहेमी आढळणारी आडनावे: पाटील, शिंदे, जाधव, भोसले, कुलकर्णी, जोशी, देशपांडे, देशमुख, कांबळे ही आहेत.
मराठीतील कर-अंती आडनावे गावांच्या नावावरून पडली आहेत. माडगुळकर ([[माडगुळ]] गावावरून, वेंगसरकर, गावसकर, बांदेकर वगैरे. बाकीची नेहेमी आढळणारी आडनावे: पाटील, कुलकर्णी, जोशी, देशपांडे, देशमुख, सुतार, वाणी ही नावे, ती माणसे एकेकाळी करत असलेल्या व्यवसायावरून किंवा गावातील पदावरून पडली आहेत, तर शिंदे, जाधव, भोसले, कांबळे या नावाच्या उत्पत्त्या भिन्नभिन्न आहेत.


गुजरातमधील काही आडनावे "वाला"-अंती असतात. ती गावावरून किंवा व्यवसायावरुन पडलेली आहेत. लंडनवाला, मेहवाला, लकडावाला वगैरे. बाकीची नेहेमी आढळणारी आडनावे: मेहता, पटेल, शाह, देसाई, पारेख वगैरे.
गुजरातमधील काही आडनावे "वाला"-अंती असतात. ती गावावरून किंवा व्यवसायावरून पडलेली आहेत. लंडनवाला, मेहवाला, लकडावाला वगैरे. बाकीची नेहेमी आढळणारी आडनावे: मेहता, पटेल, शाह, देसाई, पारेख वगैरे. यांतलीही काही व्यवसायावरून पडली आहेत.


== '''महाराष्ट्रातील नावे''' ==
== '''महाराष्ट्रातील नावे''' ==

२०:०२, १३ ऑगस्ट २०११ ची आवृत्ती

भारतातील नावे वेगवेगळ्या पद्धतींवर आधारित आहेत. नावे आणि आडनावे जाती, धर्म, भाषा आणि प्रदेश अशा गोष्टींनुसार बदलतात. उदाहरणार्थ: उत्तर भारतात आडनावे वापरली जातात तर दक्षिण भारतात (तामिळनाडू, केरळ) बरेचसे लोक आडनावे वापरत नाहीत.

अनेक भारतीयांचे जन्मनाव त्यांच्या अधिकृत नावापेक्षा वेगळे असते. जन्मनाव अनेकदा ज्योतिषशास्त्रानुसार ठेवले जाते. जेथे आडनावे वापरात नाहीत अशा ठिकाणी तिसरे नाव म्हणून आजोबा/आजीचे नाव किंवा गावाचे नाव वापरण्याचा संकेत आहे. ज्या ठिकाणी समाजवादी विचारांचा प्रभाव आहे अशा ठिकाणी समाजवादी नेत्यांची किंवा रशियातील नावे वापरण्याचीही पद्धत आहे. उदाहरण: स्टॅलीन (तामिळनाडूचे मुख्यमंत्री करूणानिधी यांचे पुत्र), लोलिता, गोगोल

भारताच्या पूर्व भागातील नावे

पश्चिमी भारतातील नावे

महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांतील नामकरण पद्धतीमध्ये मधले नाव वडिलांचे किंवा पतीचे ठेवले जाते. उदाहारण: सचिन रमेश तेंडुलकर या क्रिकेटपटूच्या नावातील पहिले नाव "सचिन", मधले नाव "रमेश" हे वडिलांचे नाव तर "तेंडुलकर" हे आडनाव आहे.

स्त्रिया लग्नानंतर परंपरेनुसार पतीचे नाव व आडनाव वापरतात. महाराष्ट्रात नातवाला आजोबांचे नाव देण्याची पद्धत एकेकाळी होती. गुजरातमध्ये नावानंतर भाई (पुरुषांसाठी) किंवा बेन (स्त्रियांसाठी) लावण्याची पद्धत आहे. महाराष्ट्रात काही समाजात पुरुषांच्या नावांना राव तर स्त्रियांच्या नावांनंतर बाई/ताई लावले जाते.

मराठीतील कर-अंती आडनावे गावांच्या नावावरून पडली आहेत. माडगुळकर (माडगुळ गावावरून, वेंगसरकर, गावसकर, बांदेकर वगैरे. बाकीची नेहेमी आढळणारी आडनावे: पाटील, कुलकर्णी, जोशी, देशपांडे, देशमुख, सुतार, वाणी ही नावे, ती माणसे एकेकाळी करत असलेल्या व्यवसायावरून किंवा गावातील पदावरून पडली आहेत, तर शिंदे, जाधव, भोसले, कांबळे या नावाच्या उत्पत्त्या भिन्नभिन्न आहेत.

गुजरातमधील काही आडनावे "वाला"-अंती असतात. ती गावावरून किंवा व्यवसायावरून पडलेली आहेत. लंडनवाला, मेहवाला, लकडावाला वगैरे. बाकीची नेहेमी आढळणारी आडनावे: मेहता, पटेल, शाह, देसाई, पारेख वगैरे. यांतलीही काही व्यवसायावरून पडली आहेत.

महाराष्ट्रातील नावे

महाराष्ट्र
मराठी, कोकणी
तोडणकर, केरुळ्कर , अंकलीकर , अकोलकर, अग्निहोत्री, अधिकारी , अवचट, आगरकर, आगलावे, आजगावकर, आडवे , आडेकर, आठवले, आपटे , आंबेकर , आरोंदेकर, एकबोटे, ओगळे, कडू , कदम , कपाळे, करकरे, करडे, करमरकर, करवंदे, कर्वे, कल्याणी, काजळे , कातोते, कानडे, कानफाडे, कानविंदे, कानिटकर, कापसे, कांबळे, कामत, कामाने, कामेरकर, कारखानीस, कारुळकर, कारेकर, कालगुडे (जाधव), काशीकर , काळे , कीर्तिकर, कुर्लेकर, कुलकर्णी, केकडे, केरकर, केसकर, केळकर, कोकाटे, कोठारे, कोतवाल, कोरगावकर, कोहोजकर, कोळी, कोळे, कोळेकर, खड्ये, खरे, खर्चे, खाटमोडे, खानवकर, खानविलकर, खानोलकर, खुतारकार, खोचरे, खोटे, गडकर, गडकरी, गद्रे, गबाळे, गवस, गवळी, गवाणकर, गव्हाणे, गांजावाला, गाढे, गायतोंडे, गावडे, गावणकर, गावसकर, गुप्ते, गुरव, गोखले, गोडसे, गोंदकर, गोरुले, गोरे, गोवारीकर, गोवित्रीकर, गोवेकर, गोसावी, घाटगे, घाडगे, घेवडे, घुरये, चंद्रात्रे, चंद्रात्रेय, चरपे, चव्हाण, चांदोरकर, चांदोलकर, चापेकर, चिकणे, चिटणीस, चितळे, चिंदरकर , चिपळूणकर, चौगुले, चौधरी, चौरे, छत्रे, जगताप, जगदाळे, जयकर, जवळकर, जाधव, जांभळे, जावकर, जिचकर, जोशी, झरे, झरेकर, झोपे, झेंडे, झारापकर, टकले, टिळक, टेंबे, डोईफोडे, डोके, डोंगरे, ढमढेरे, ढमाले, ढोबळे , तळपदे, ताकसांडे, तांबे, ताटे, तळेले, तावडे, तन्नू, तेंडूलकर, दगडे, दंडवते, दहिभाते, दळवी, दांडे, दांडेकर, दाते, दाभेकर, दामले, दिवाडकर, दिवाळे, दिवेकर, दीक्षित, दुर्गुडे, देऊलकर, देव, देवकर, देवळेकर, देवधर, देशपांडे, देशमाने, देशमुख, देसले, देसाई, देहाडे, देहाद्राय, धनावडे, धामणे, धारप, निकम, नाले, नांदरे, नावकर, नाईक, नाडकर्णी, नगरनाईक, सरनाईक, नखरे ,नासरे , नेमाने, नेणे, निमकर, निंभोरकर, निंबाळकर, नेरुरकर,पडवळ, पारकर, परब, पाटील, पाताडे, पवार, पाटकर , परांजपे , पंडित, पावगी, पेडणेकर , फुटाणे, पिळगावकर,पिळणकर, पितळे , पोटदुखे , पोवार , प्रभू , पुजारी , पुळेकर , पालेकर , फुले , पिसाळ , पेंडसे , पेठे , , पाठक, परते , पाटणकर , पेंढारकर , पोतदार , पोतनीस, पुडके फडके, फाकले, फाटक, फुले, फुलझेले , फुलपगारे , फुलमाळी , फुलसुंदर , बाळफाटक, बारटक्के, बर्वे, बागवे, बोरसे, बामणे, बागगावकर, बापट , बोबडे , बोरकर ,बेलसरे , बेंद्रे , बोरगावकर, बेर्डे , भट, भोसले , भाटवडेकर , भोमकर, भोते, भोगले, भोले, भुजबळ, मडके, मेस्त्री, महाडिक, माडीवाले, महामुनी, महेंद्रकर, मांजरेकर, गाडगीळ , मालवणकर, माने, मराठे, मातुरे, महागावकर, मेहेंदळे, मेश्राम, मोडक, मोहरीर, मुंडे, मुझुमदार, मुरकुटे, म्हात्रे, मोने, मुळे, मोरे, मोहिते, माहिमकर, मसुरकर, राणे, रेगे, , राजे, राहते , रतनाळीकर, रत्नपारखी, रांगणेकर, रसम, राव , रानडे , राचमले, रेवणकर, रिसबूड, लाले, लागू, लाखे, लाड, लेले, लोखंडे, लिमये, लोटलीकर, वडाभात,वर्तक, विचारे , विद्वांस, वंजारे, वझे , वेंगुर्लेकर , विंझे , वाटवे , वाळवे, वाघ , वांयगणकर , शंभरकर, शिंदे, शेट्ये, शिर्के, शेळके, शिवडे, सहस्रबुद्धे, सकारकर, साळवी, सामंत, सरवदे, सरोदे, साटम, सावंत, सावर्डेकर, शहाणे, साने, सोनावणे, सुखटणकर, सातपुते, सोनारकर, सोपारकर, सुर्वे, हगवणे , हरदास , हर्डीकर, क्षीरसागर. चनशेट्टी

दक्षिणी भारतातील नावे

प्राचीन काळापासून दक्षिणी भारतीय लोकांत एक सरळ नामकरण पद्धती प्रचलित आहे. ऐतिहासिक काळापासून, प्रत्येक व्यक्तीला एकच नाव दिले जात होते. ते पुढील कारणांपैकी एका कारणामुळे दिले जात असे. :

  • त्याचे गाव किंवा नगराचे नाव, उदा., सिंग्री (सिंगिरी), बंगळूर, उद्यवारा, चिट्टी, कुलार, चावली, इंकोल्लु, हट्टिंगडी, जनस्वामी, हुबळी, कोकर्डी, इत्यादी.
  • त्यांच्या परिवारावरून किंवा वंशावरून नाव, उदा. पुलितेवर, सहोंता.
  • जातीवरून नाव, उदा. अय्यर, राव, नायर.

उत्तरेतील नावे