Jump to content

"जयंत्यांची यादी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १५: ओळ १५:
* कल्की जयंती (श्रावण शुद्ध पंचमी)
* कल्की जयंती (श्रावण शुद्ध पंचमी)
* काळभैरव जयंती (कार्तिक वद्य सप्तमी)
* काळभैरव जयंती (कार्तिक वद्य सप्तमी)
* कुसुमाग्रज जन्मदिवस /मराठी भाषा दिवस (२७ फेब्रुवारी)
* कूर्म जयंती (वैशाख/बुद्ध पौर्णिमा)
* कूर्म जयंती (वैशाख/बुद्ध पौर्णिमा)
* कृष्ण जयंती (श्रावण वद्य सप्तमी)
* कृष्ण जयंती (श्रावण वद्य सप्तमी)
ओळ ३२: ओळ ३३:
* जोतिबा फुले जयंती (११ एप्रिल)
* जोतिबा फुले जयंती (११ एप्रिल)
* टिळक जयंती (२३ जुलै)
* टिळक जयंती (२३ जुलै)
* तलत महमूद जयंती (२४ फेब्रुवारी)
* तुकडोजी महाराज जयंती (३० एप्रिल)
* तुकडोजी महाराज जयंती (३० एप्रिल)
* तुळशीदास जयंती (श्रावण शुद्ध/शितळा सप्तमी)
* तुळशीदास जयंती (श्रावण शुद्ध/शितळा सप्तमी)
ओळ ४७: ओळ ४९:
* भारतीय ग्राहक दिन (२४ डिसेंबर)
* भारतीय ग्राहक दिन (२४ डिसेंबर)
* मध्वाचार्य जयंती (आश्विन शुद्ध/विजया दशमी)
* मध्वाचार्य जयंती (आश्विन शुद्ध/विजया दशमी)
* मराठी भाषा दिवस/कुसुमाग्रज जन्मदिवस (२७ फेब्रुवारी)
* महाराष्ट्र दिन (१ मे)
* महाराष्ट्र दिन (१ मे)
* मत्स्य जयंती (चैत्र शुद्ध तृतीया)
* मत्स्य जयंती (चैत्र शुद्ध तृतीया)
ओळ ७९: ओळ ८२:
* सावित्रीबाई फुले जयंती(महिला मुक्तिदिन) (३ जानेवारी)
* सावित्रीबाई फुले जयंती(महिला मुक्तिदिन) (३ जानेवारी)
* सुभाष जयंती (२३ जानेवारी)
* सुभाष जयंती (२३ जानेवारी)
* (जागतिक)स्काउट दिवस (बेडेन-पॉवेल जन्मदिवस)(२२ फेब्रुवारी)
* स्वामिनारायण जयंती (चैत्र शुद्ध नवमी)
* स्वामिनारायण जयंती (चैत्र शुद्ध नवमी)
* हनुमान जयंती(चैत्र पौर्णिमा)
* हनुमान जयंती(चैत्र पौर्णिमा)

१५:२०, २४ फेब्रुवारी २०११ ची आवृत्ती

पौराणिक आणि इतर प्राचीन ग्रंथांत ज्यांचे उल्लेख आहेत अशा, आणि पूर्वी होऊन गेलेल्या अन्य थोर व्यक्तींच्या जन्मदिवसास जयंती असे म्हणतात. पंचागांतील तिथीनुसार देवादिकांच्या आणि ऋषिमुनींच्या जयंत्या साजर्‍या करण्याची पद्धत भारतात पूर्वपरंपरेने आहे. एकोणिसाव्या शतकापासून ग्रेगोरियन कालगणनेचा वापर जसा वाढत गेला तसा नव्या पिढ्यांतील लोकांचे जन्मदिवस आणि जयंत्या या भारतीय पंचागांपेक्षा ग्रेगोरियन कालगणनेनुसार पाळल्या जाऊ लागल्या. तरीसुद्धा, जुन्या काळातील लोकांच्या जयंत्या या अजूनही तिथीनुसारच साजर्‍या होतात.[ संदर्भ हवा ]

जयंतीच्या उत्सवाची पारंपरिक प्रथा बहुशः धार्मिक अथवा भक्तिस्वरूपी असते. भक्तीच्या नवविधा प्रकारांतपैकी एक म्हणजे जयंत्या साजर्‍या करणे, असे समर्थ रामदास दासबोधाच्या चवथ्या दशकात श्रवणभक्ती संदर्भातील समासात सांगतात. विसाव्या शतकापासून भारतात जशी राजकीय जागृतीस सुरुवात झाली तसे लोकोत्तर स्त्री-पुरुषांच्या जयंत्या या सामाजिक आणि राजकीय अभिसरणाचे माध्यम म्हणून सार्वजनिक कार्यक्रमाच्या रूपाने साजर्‍या होऊ लागल्या. यांत लोकमान्य टिळकांनी सार्वजनिकरीत्या साजरी करण्याची सुरुवात केलेल्या शिवजयंतीचे उदाहरण ठळकपणे मांडण्यासारखे आहे.


  • अक्कलकोटस्वामी जयंती (चैत्र शुद्ध द्वितीया)
  • अण्णा भाऊ साठे जयंती (१ ऒगस्ट)
  • आद्य शंकराचार्य जयंती (वैशाख शुद्ध पंचमी)
  • आंबेडकर जयंती (१४ एप्रिल)
  • औद्योगिक सुरक्षा दिवस (२ नोव्हेंबर)
  • कबीर जयंती (ज्येष्ठ पौर्णिमा)
  • कल्की जयंती (श्रावण शुद्ध पंचमी)
  • काळभैरव जयंती (कार्तिक वद्य सप्तमी)
  • कुसुमाग्रज जन्मदिवस /मराठी भाषा दिवस (२७ फेब्रुवारी)
  • कूर्म जयंती (वैशाख/बुद्ध पौर्णिमा)
  • कृष्ण जयंती (श्रावण वद्य सप्तमी)
  • ख्रिस्त जयंती (२५ डिसेंबर)
  • गणेश जयंती (माघ शुद्ध चतुर्थी)
  • गांधी जयंती (२ ऑक्टोबर)
  • गीता जयंती (मार्गशीर्ष शुद्ध एकादशी)
  • गोविंदसिंह जयंती (५ जानेवारी)
  • चैतन्य जयंती (फाल्गुन/होळी पौर्णिमा)
  • जलाराम जयंती (कार्तिक शुद्ध सप्तमी)
  • जागतिक कामगार दिवस (१ मे)
  • जागतिक दूरसंचार दिवस (१७ मे)
  • जागतिक मातृदिन (८ मे)
  • जागतिक मुद्रण दिन (२४ फेब्रुवारी)
  • जागतिक रक्तदान दिवस (१ ऑक्टोबर)
  • जागतिक रेडक्रॉस दिवस (८ मे)
  • जोतिबा फुले जयंती (११ एप्रिल)
  • टिळक जयंती (२३ जुलै)
  • तलत महमूद जयंती (२४ फेब्रुवारी)
  • तुकडोजी महाराज जयंती (३० एप्रिल)
  • तुळशीदास जयंती (श्रावण शुद्ध/शितळा सप्तमी)
  • दत्त जयंती (मार्गशीर्ष पौर्णिमा)
  • दधीची जयंती (भाद्रपद शुद्ध अष्टमी)
  • धन्वंतरी जयंती (आश्विन वद्य/धन त्रयोदशी)
  • नानक जयंती (कार्तिक/त्रिपुरारी पौर्णिमा)
  • नारद जयंती (वैशाख वद्य प्रतिपदा)
  • नृसिंह जयंती (वैशाख शुद्ध चतुर्दशी)
  • नेहरू जयंती(बाल दिन) (१४ नोव्हेंबर)
  • परशुराम जयंती (वैशाख शुद्ध/अक्षय्य तृतीया)
  • पार्श्वनाथ जयंती (मार्गशीर्ष वद्य दशमी)
  • पैगंबर जयंती(शिया)(१७ रबिलावर)
  • पैगंबर जयंती(सुन्नी) (१२ रबिलावर)
  • भारतीय ग्राहक दिन (२४ डिसेंबर)
  • मध्वाचार्य जयंती (आश्विन शुद्ध/विजया दशमी)
  • मराठी भाषा दिवस/कुसुमाग्रज जन्मदिवस (२७ फेब्रुवारी)
  • महाराष्ट्र दिन (१ मे)
  • मत्स्य जयंती (चैत्र शुद्ध तृतीया)
  • महावीर जयंती (चैत्र शुद्ध त्रयोदशी)
  • बसवेश्वर जयंती (वैशाख शुद्ध द्वितीया)
  • बुद्ध जयंती (वैशाख पौर्णिमा)
  • भानुदास महाराज जयंती (माघ वद्य अष्टमी)
  • रविदास जयंती (माघ पौर्णिमा)
  • रवींद्रनाथ टागोर जयंती (८ मे)
  • राणा प्रताप जयंती (ज्येष्ठ शुद्ध तृतीया)
  • राधाकृष्णन जयंती(शिक्षक दिन)(५ सप्टेंबर)
  • राम नवमी (चैत्र शुद्ध नवमी)
  • राष्ट्रीय अखंडता दिवस (४ ऑक्टोबर)
  • लवकुश जयंती (श्रावण/नारळी पौर्णिमा)
  • लालबहाद्दुर शास्त्री जयंती(२ ऑक्टोबर)
  • लाला लजपतराय जयंती (२८ जानेवारी)
  • वराह जयंती ((भाद्रपद शुद्ध तृतीया)
  • वल्लभभाई पटेल जयंती (३१ ऑक्टोबर)
  • वल्लभाचार्य जयंती (चैत्र वद्य एकादशी)
  • वामन जयंती (भाद्रपद शुद्ध द्वादशी)
  • वाल्मीकी जयंती (आश्विन/कोजागिरी पौर्णिमा)
  • विनोबा भावे जयंती (११ सप्टेंबर)
  • विवेकानंद जयंती (पौष वद्य सप्तमी; १२ जानेवारी)
  • विश्वकर्मा जयंती (माघ शुद्ध त्रयोदशी)
  • शनि जयंती (वैशाख अमावास्या)
  • शाहू जयंती (२६ जून)
  • श्यामाप्रसाद मुखर्जी जयंती (६ जुलै)
  • शिवाजी जयंती (पूर्वी वैशाख शुद्ध तृतीया, नंतर फाल्गुन वद्य तृतीया; २००१ सालापासून १९ फेब्रुवारी)
  • संस्कृत दिवस (श्रावण/नारळी पौर्णिमा)
  • सहस्रबाहू जयंती (कार्तिक शुद्ध सप्तमी)
  • सावरकर जयंती (२८ मे)
  • सावित्रीबाई फुले जयंती(महिला मुक्तिदिन) (३ जानेवारी)
  • सुभाष जयंती (२३ जानेवारी)
  • (जागतिक)स्काउट दिवस (बेडेन-पॉवेल जन्मदिवस)(२२ फेब्रुवारी)
  • स्वामिनारायण जयंती (चैत्र शुद्ध नवमी)
  • हनुमान जयंती(चैत्र पौर्णिमा)
  • हरगोविंदसिंह जयंती (ज्येष्ठ वद्य प्रतिपदा)
  • हेडगेवार जयंती (चैत्र शुद्ध प्रतिपदा)
  • ज्ञानेश्वर जयंती (श्रावण शुद्ध सप्तमी)


हेही पाहा