"रामचंद्र भिकाजी गुंजीकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो गुंजीकर, रामचंद्र भिकाजी moved to रामचंद्र भिकाजी गुंजीकर
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १०: ओळ १०:
|चित्र = -
|चित्र = -
}}
}}

(जन्म-१० एप्रिल १८४३, जांबोटी, जिल्हा बेळगांव. मृत्यू-१८ जून १९०१, मुम्बई).

'विविधज्ञानविस्तार" मासिकाचे आद्य संपादक. मराठीतील 'मोचनगड' या पहिल्या ऐतिहासिक कादंबरीचे जनक. मराठी लघुलिपीचे आद्य उत्पादक. प्राथमिक शिक्षण जांबोटी व बेळगांव येथे. मुंबईच्या एल्फ़िन्स्टन हायस्कूलमधून मॅट्रिक(१८६४) व त्याच हायस्कूलमध्ये शिक्षक(१८६७). १८८८ साली हुबळी अँग्लोव्हर्नाक्युलर शाळेत हेडमास्तर व १८९२ मध्ये बेळगांव जिल्ह्याचे असिस्टंट डेप्युटी एज्युकेशनल इन्स्पेक्टर.

कॉलेजात असताना 'मित्रोदय' या वृत्तपत्रातून(१८६६) ते लेख लिहू लागले. इंग्लंडमधील 'एडिंबरो रिव्ह्यू' व 'क्वार्टर्ली रिव्ह्यू' या नियतकालिकांच्या धर्तीवर मासिक निघावे या विचाराने १८६७ मध्ये 'विविधज्ञानविस्तारा'ची स्थापना झाली. त्याचे गुंजीकर हे पहिले संपादक. पण सरकारी नोकरीमुळे त्यांचे नाव अंकावर छापण्यात आले नव्हते. पहिल्या अंकात संपादकांनी या मासिकाचे स्वरूप पुढीलप्रमाणे स्पष्ट केले आहे.: "याच्या परिमाणानुसार त्यात नानाविध विषयांचा संग्रह केला जाईल. शास्त्रीय विषय, देशज्ञान, विख्यात पुरुषांची चरित्रे, नवीन पुस्तकांचे गुणावगुणविवेचन, नीतिवादाचे निबंध इत्यादी अनेक विषयांचा संग्रह करणार आहोत." गुंजीकरांना मराठी, संस्कृत, इंग्रजीबरोबरच गुजराथी, कानडी व बंगाली याही भाषा अवगत होत्या. त्यामुळे या वाचनाच्या बळावर ते अनेक नावीन्यपूर्ण व विविध माहिती सांगणारी सदरे सजवू शकले. पहिली सात वर्षे(१८६७-१८७४) त्यांनी सातत्याने व परिश्रमपूर्वक संपादन केले. अनेक व्यासंगी विद्वानांचे सहकार्य मिळवून उच्च दर्जाचे ज्ञानप्रसारक नियतकालिक असा लौकिक त्यांनी 'वि.ज्ञा.वि'ला मिळवून दिला. त्यांनी त्यात लिहिलेल्या लेखातील काही निवडक लेख, ''संकलित लेख, प्रथम खंड'' (१९४२) यात आले आहेत. 'मराठी भाषा', 'मराठी भाषेचे कोश', 'देशभाषांची दुर्दशा', 'आपल्या भाषेची स्थिती', 'आपल्या भाषेचे पुढे काय होणार?', 'मराठी कविता', 'काव्यविचार', 'व्याकरणविचार' आदी त्यातले लेख पाहिले म्हणजे त्यांचे सखोल विचार व तळमळ लक्षात येते. त्यांच्या चार स्नेह्यांनी मुंबईत सुरू केलेल्या(१० ऑक्टोबर, १८७१)'दंभहादक(?)' या मासिकासाठीही त्यांनी काही लेखन केले आहे.

(अपूर्ण)


रामचंद्र भिकाजी गुंजीकर हे तत्कालीन उल्लेखनीय साहित्यिक होते. विशेषतः मूळचे [[गोवा|गोव्याचे]] असल्यामुळे त्यांनी गोव्यातील मराठी साहित्यात घातलेली भर फार मोलाची आहे.
रामचंद्र भिकाजी गुंजीकर हे तत्कालीन उल्लेखनीय साहित्यिक होते. विशेषतः मूळचे [[गोवा|गोव्याचे]] असल्यामुळे त्यांनी गोव्यातील मराठी साहित्यात घातलेली भर फार मोलाची आहे.

००:२०, ९ फेब्रुवारी २००७ ची आवृत्ती

रामचंद्र भिकाजी गुंजीकर
चित्र:-
शिक्षण -


(जन्म-१० एप्रिल १८४३, जांबोटी, जिल्हा बेळगांव. मृत्यू-१८ जून १९०१, मुम्बई).

'विविधज्ञानविस्तार" मासिकाचे आद्य संपादक. मराठीतील 'मोचनगड' या पहिल्या ऐतिहासिक कादंबरीचे जनक. मराठी लघुलिपीचे आद्य उत्पादक. प्राथमिक शिक्षण जांबोटी व बेळगांव येथे. मुंबईच्या एल्फ़िन्स्टन हायस्कूलमधून मॅट्रिक(१८६४) व त्याच हायस्कूलमध्ये शिक्षक(१८६७). १८८८ साली हुबळी अँग्लोव्हर्नाक्युलर शाळेत हेडमास्तर व १८९२ मध्ये बेळगांव जिल्ह्याचे असिस्टंट डेप्युटी एज्युकेशनल इन्स्पेक्टर.

कॉलेजात असताना 'मित्रोदय' या वृत्तपत्रातून(१८६६) ते लेख लिहू लागले. इंग्लंडमधील 'एडिंबरो रिव्ह्यू' व 'क्वार्टर्ली रिव्ह्यू' या नियतकालिकांच्या धर्तीवर मासिक निघावे या विचाराने १८६७ मध्ये 'विविधज्ञानविस्तारा'ची स्थापना झाली. त्याचे गुंजीकर हे पहिले संपादक. पण सरकारी नोकरीमुळे त्यांचे नाव अंकावर छापण्यात आले नव्हते. पहिल्या अंकात संपादकांनी या मासिकाचे स्वरूप पुढीलप्रमाणे स्पष्ट केले आहे.: "याच्या परिमाणानुसार त्यात नानाविध विषयांचा संग्रह केला जाईल. शास्त्रीय विषय, देशज्ञान, विख्यात पुरुषांची चरित्रे, नवीन पुस्तकांचे गुणावगुणविवेचन, नीतिवादाचे निबंध इत्यादी अनेक विषयांचा संग्रह करणार आहोत." गुंजीकरांना मराठी, संस्कृत, इंग्रजीबरोबरच गुजराथी, कानडी व बंगाली याही भाषा अवगत होत्या. त्यामुळे या वाचनाच्या बळावर ते अनेक नावीन्यपूर्ण व विविध माहिती सांगणारी सदरे सजवू शकले. पहिली सात वर्षे(१८६७-१८७४) त्यांनी सातत्याने व परिश्रमपूर्वक संपादन केले. अनेक व्यासंगी विद्वानांचे सहकार्य मिळवून उच्च दर्जाचे ज्ञानप्रसारक नियतकालिक असा लौकिक त्यांनी 'वि.ज्ञा.वि'ला मिळवून दिला. त्यांनी त्यात लिहिलेल्या लेखातील काही निवडक लेख, संकलित लेख, प्रथम खंड (१९४२) यात आले आहेत. 'मराठी भाषा', 'मराठी भाषेचे कोश', 'देशभाषांची दुर्दशा', 'आपल्या भाषेची स्थिती', 'आपल्या भाषेचे पुढे काय होणार?', 'मराठी कविता', 'काव्यविचार', 'व्याकरणविचार' आदी त्यातले लेख पाहिले म्हणजे त्यांचे सखोल विचार व तळमळ लक्षात येते. त्यांच्या चार स्नेह्यांनी मुंबईत सुरू केलेल्या(१० ऑक्टोबर, १८७१)'दंभहादक(?)' या मासिकासाठीही त्यांनी काही लेखन केले आहे.

(अपूर्ण)

रामचंद्र भिकाजी गुंजीकर हे तत्कालीन उल्लेखनीय साहित्यिक होते. विशेषतः मूळचे गोव्याचे असल्यामुळे त्यांनी गोव्यातील मराठी साहित्यात घातलेली भर फार मोलाची आहे.