Jump to content

"विमलकीर्ती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: डॉ. विमलकीर्ती (जन्म: एल.जी. मेश्राम) हे भारतीय बौद्ध विद्वान, आंबे...
(काही फरक नाही)

१४:२४, १९ डिसेंबर २०२० ची आवृत्ती

डॉ. विमलकीर्ती (जन्म: एल.जी. मेश्राम) हे भारतीय बौद्ध विद्वान, आंबेडकरी विचारवंत, पाली भाषेचे व्यासंगी आणि मराठी व हिंदी भाषेतील लेखक होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पाली-पाकृत विभागाचे ते प्रमुख होते. ते उत्तम वक्ता सुद्धा होते. त्यांनी एकूण ८१ पुस्तकांचे लेखन; तसेच अनुवाद केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे त्यांचे प्रेरणास्रोत होते.

विमलकीर्ती हे भंडारा जिल्ह्यातील मूळचे रहिवासी होते, व त्यांचे मूळ नाव एल.जी. मेश्राम होते. भदंत डॉ. आनंद कौसल्यायन यांच्या सहवासात आल्यानंतर ते डॉ. विमलकीर्ती झाले. सुमारे दोन दशके ते कौसल्यायन यांच्या सहवासात होते. त्यातून त्यांना आंतरिक प्रेरणांच्या शोधाची आणि या शोधातून गवसले ते प्रसृत करण्याची प्रेरणा मिळाली. ते पाली साहित्याचे व्यासंगी विद्वान होते. तथागत बुद्धांंच्या विचारांची मांडणी त्यांनी मराठी-हिंदीतील पुस्तकांद्वारे केली, यात 'त्रिपिटक' सुद्धा होते. १९७९मध्ये 'स्वतंत्र मजूर पक्ष' हे त्यांचे पहिले पुस्तक आले होते, जे बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या 'स्वतंत्र मजूर पक्ष' या राजकीय पक्षावर आधारित होते. पालीविषयक पुस्तकांशिवाय महात्मा जोतीराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित खंडरूपात त्यांनी लिखाण केले. त्यांचे लिखाण हे आंबेडकरी चळवळीला दिशादर्शन करणारे असल्याचे मानले जाते.