"राजा मयेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: लोकनाटयाचा राजा’असा किताब मिळवणारे राजा मयेकर (जन्म : इ.स. १९३०; म... |
(काही फरक नाही)
|
१०:२०, १६ फेब्रुवारी २०२० ची आवृत्ती
लोकनाटयाचा राजा’असा किताब मिळवणारे राजा मयेकर (जन्म : इ.स. १९३०; मृत्यू : मुंबई, १५ फेब्रुवारी २०२०) तब्बल ६० वर्षे अभिनयाचे क्षेत्र गाजवले. वयाच्या १५व्या वर्षापासून त्यांनी दशावतारी नाटकापासून रंगभूमीवर काम करायला सुरुवात केली होती. राजा मयेकर यांचे अभिनयात पहिले पाऊल पडलं ते कृष्णराव गणपतराव साबळे तथा शाहीर साबळे यांच्यामुळे. त्यामुळे आपल्या कारकिर्दीविषयी बोलताना त्यांचा उल्लेख ते नेहमीच करत असत.
राजा मयेकर यांनी नाटक, सिनेमा, टीव्ही मालिका आणि आकाशवाणी या चारही क्षेत्रांत काम केले. दूरदर्शनवरील 'गप्पागोष्टी' ही त्यांची मालिका एकेकाऴी प्रचंड गाजली होती.
राजा मयेकर यांची भूमिका असलेली व गाजलेली नाटके/लोकनाट्ये
- असुनी खास मालक घरचा (लोकनाट्य)
- आंधळं दळतंय (लोकनाट्य)
- कोयना स्वयंवर (नाटक)
- नशीब फुटकं सांधून घ्या (नाटक)
- बापाचा बाप (नाटक)
- यमराज्यात एक रात्र (लोकनाट्य)
[[वर्ग:इ.स.१९३० मधील जन्म)