"तेरेसा (निकोबारमधील बेट)" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: तेरेसा हे निकोबारमधील २२ बेटांमधील एक बेट आहे. ==इतिहास== जेव्हा ऑ... |
(काही फरक नाही)
|
१२:३४, २५ जानेवारी २०२० ची आवृत्ती
तेरेसा हे निकोबारमधील २२ बेटांमधील एक बेट आहे.
इतिहास
जेव्हा ऑस्ट्रिया (इ.स. १७७८-१७८४) आणि डेन्मार्क (इ.स. १७५४-१८६८) या देशांनी तेरेसा आपलीच वसाहत आहे असा दावा केला, त्यावेळी त्यांनी बेटाला ऑस्ट्रियन आर्च-डचेस (रोमन साम्राज्यातील आर्चड्यूक या शासकाच्या घराण्यातील राजकन्या) मारिया थेरेसियाचे नाव दिले. तेरेसा बेटाची इ.स. २००४ साली आलेल्या त्सुनामीत फार हानी झाली.
भूगोल
तेरेसा हे निकोबारमधील कामोत्रा बेटाच्या पश्चिमेला आणि काटचाई बेटाच्या वायव्येला आहे. तेरेसाच्या पूर्वेला चूरा आणि बाॅमपोका ही दोन लहान बेटे आहेत. तेरेसा बेटाचे क्षेत्रफळ १०१ चौरस किलोमीटर आहे.. बेताच्या उत्तरी टोकाची समुद्रसपाटीपासूनची उंची ८७ मीटर आहे.
लोकसंख्या
तेरेसाची लोकसंख्या २०११ साली १,934 इतकी होती. पैकी बंगालीभाषक ३५४, कालसी जातीचे ३३५ आणि मिनयुक जातीचे लोक ३०५ होती.
शासन
नानकौरी शहराचा हिस्सा असलेले तेरेसा हे तेरेसा तालुक्यात येते.
चौपाटी
तेरेसा बेटाच्या पूर्वेला सफद वाळूची चौपाटी आहे.