तेरेसा (निकोबारमधील बेट)
island in India | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | बेट | ||
---|---|---|---|
ह्याचा भाग | निकोबार द्वीपसमूह | ||
स्थान | अंदमान आणि निकोबार बेटे, भारत | ||
पाणीसाठ्याजवळ | हिंदी महासागर | ||
रुंदी |
| ||
लांबी |
| ||
लोकसंख्या |
| ||
क्षेत्र |
| ||
समुद्रसपाटीपासूनची उंची |
| ||
| |||
तेरेसा हे भारताच्या निकोबार द्वीपसमूहातील २२ बेटांमधील एक बेट आहे.
इतिहास
[संपादन]जेव्हा ऑस्ट्रिया (इ.स. १७७८-१७८४) आणि डेन्मार्क (इ.स. १७५४-१८६८) या देशांनी तेरेसा आपलीच वसाहत आहे असा दावा केला, त्यावेळी त्यांनी बेटाला ऑस्ट्रियन आर्च-डचेस (रोमन साम्राज्यातील आर्चड्यूक या शासकाच्या घराण्यातील राजकन्या) मारिया थेरेसियाचे नाव दिले. तेरेसा बेटाची इ.स. २००४ साली आलेल्या त्सुनामीत फार हानी झाली.
भूगोल
[संपादन]तेरेसा हे निकोबारमधील कामोत्रा बेटाच्या पश्चिमेला आणि काटचाई बेटाच्या वायव्येला आहे. तेरेसाच्या पूर्वेला चूरा आणि बाॅमपोका ही दोन लहान बेटे आहेत. तेरेसा बेटाचे क्षेत्रफळ १०१ चौरस किलोमीटर आहे.. बेताच्या उत्तरी टोकाची समुद्रसपाटीपासूनची उंची ८७ मीटर आहे.
लोकसंख्या
[संपादन]तेरेसाची लोकसंख्या २०११ साली १,९३४ इतकी होती. पैकी बंगालीभाषक ३५४, कालसी जातीचे ३३५ आणि मिनयुक जातीचे लोक ३०५ होती.
शासन
[संपादन]नानकौरी शहराचा हिस्सा असलेले तेरेसा हे तेरेसा तालुक्यात येते.
चौपाटी
[संपादन]तेरेसा बेटाच्या पूर्वेला सफद वाळूची चौपाटी आहे.