Jump to content

"बाबाजी कृष्ण गोखले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: बाबाजी कृष्ण गोखले (मृत्यू : १९ डिसेंबर १८८३) हे कादंबरीकार, पत्रक...
(काही फरक नाही)

२०:३६, १७ जानेवारी २०२० ची आवृत्ती

बाबाजी कृष्ण गोखले (मृत्यू : १९ डिसेंबर १८८३) हे कादंबरीकार, पत्रकार आणि मराठीबरोबरच इंग्रजी भाषेचे फर्डे लेखक होते.

बाबाजींचे शिक्षण पुण्यात झाले. ख्यातनाम इंग्रजी कवी एडविन अर्नोल्ड यांच्या हाताखाली शिकण्याचे भाग्य त्यांना लाभले. पुणे कॉलेजातून बाहेर पडल्यावर त्यांनी एक शाळाही काढली. यानंतर पुणे म्युनिसिपालटीतही काम केले. तेथे असताना 'पुणे' येथील म्युनिसिपालटीच्या सुधारणेविषयी 'सूचना ' हा निबंधही त्यांचा गाजला. त्यांचा हा निबंध नव्या कल्पना आणि नव्या लोकशाही आदर्शांनी युक्त असून मराठीच्या अभिव्यक्तीची नवी सामर्थ्ये प्रकट करणारा आहे असे मत तत्कालीन साहित्यिकांनी मांडले. याशिवाय पुण्यातील 'ज्ञानप्रकाश' या वृत्तपत्राच्या इंग्रजी विभागाचे संपादनाची धुरा बाबाजींनी वीस वर्षे सांभाळली. ते इंग्रजी इतकीच मराठी भाषाही विनोदी, खोचकर आणि व्याजोक्तपणे लिहीत.

'राजा मदन' नावाची एक अदभूतरम्य आणि 'दुःख पर्यवयासी ' कादंबरी त्यांनी लिहिली. मराठीतील अशा प्रकारची पहिलीच कादंबरी. याशिवाय बाबांनी 'लोककल्याणेच्छु' आणि ज्ञानप्रकाशमधून 'पिशाच्च', 'गोल्या घुबड', 'वेताळ पढतमूर्ख' या सहीने त्यांनी लिहिलेली पत्रे वाचकांमध्ये लोकप्रिय झाली होती. या पत्रांकरिता त्यांनी अनुसरलेली नर्मविनोदात्मक लेखनपद्धती मराठी वृत्तपत्रात अगदीच नवीन होती. तसेच मराठी वृत्तपत्रात औपचारिक शैलीत विनोदात्मक लेखन करण्याचा नवा पायंडा त्यांनी पाडला. कालांतराने खुसखुशीत लेखनाला मराठी वृत्तपत्रसृष्टीत मनाचे स्थान प्राप्त झाले. त्यांचे श्रेय बाबा गोखल्यांनाच जाते.