बाबाजी कृष्ण गोखले

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बाबाजी कृष्ण गोखले (?? - १९ डिसेंबर, १८८३) हे कादंबरीकार, पत्रकार आणि मराठी आणि इंग्लिश भाषेतील लेखक होते.

बाबाजींचे शिक्षण पुण्यात झाले. त्यांनी इंग्लिश कवी एडविन अर्नोल्ड यांच्या हाताखाली शिक्षण घेतले. कॉलेज नंतर त्यांनी एक शाळा काढली. यानंतर पुणे म्युनिसिपालटीतही काम केले. तेथे असताना 'पुणे येथील म्युनिसिपालटीच्या सुधारणेविषयी सूचना ' हा निबंध त्यांनी लिहिला. त्यांचा हा निबंध नव्या कल्पना आणि नव्या लोकशाही आदर्शांनी युक्त असून मराठीच्या अभिव्यक्तीची नवी सामर्थ्ये प्रकट करणारा आहे असे मत तत्कालीन साहित्यिकांनी मांडले. याशिवाय पुण्यातील 'ञानप्रकाश या वृत्तपत्राच्या इंग्लिश विभागाचे संपादन बाबाजींनी वीस वर्षे केले.

त्यांनी राजा मदन नावाची एक अदभूतरम्य कादंबरी लिहिली. मराठीतील अशा प्रकारची ही पहिली कादंबरी समजली जाते. याशिवाय बाबांनी लोककल्याणेच्छु आणि ज्ञानप्रकाशमधून पिशाच्च, गोल्या घुबड, वेताळ पढतमूर्ख या टोपणनावांनी पत्रे लिहिली, जी वाचकांमध्ये लोकप्रिय झाली होती. या पत्रांकरिता त्यांनी अनुसरलेली नर्मविनोदात्मक लेखनपद्धती मराठी वृत्तपत्रात अगदीच नवीन होती. तसेच मराठी वृत्तपत्रात औपचारिक शैलीत विनोदात्मक लेखन करण्याचा नवा पायंडा त्यांनी पाडला. कालांतराने खुसखुशीत लेखनाला मराठी वृत्तपत्रसृष्टीत मनाचे स्थान प्राप्त झाले. त्यांचे श्रेय बाबा गोखल्यांनाच जाते.