"जगातील उंच पुतळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: जगातील सर्वात अधिक उंच पुतळ्यांची यादी : ==स्टॅच्यू ऑफ युनिटी== वल...
(काही फरक नाही)

२०:१२, ३ नोव्हेंबर २०१९ ची आवृत्ती

जगातील सर्वात अधिक उंच पुतळ्यांची यादी :

स्टॅच्यू ऑफ युनिटी

वल्लभभाई पटेल यांचा पुतळा हा भारताच्या गुजराथ राज्यात राजपिपळा गावाजवळ नर्मदा धरणाच्या शेजारी आहे. इ.स.२०१८च्या ऑक्टोबरमध्ये याचे उद्घाटन झाले.

पुतळ्याची उंची १८२ मीटर (५९७ फूट) आहे. ६.५ रिश्टर भूकंपाच्या धक्क्यातही हा सुरक्षित राहील इतका हा मजबूत आहे. हा ताशी १८० किलोमीटर वाऱ्या वेगातही टिकेल, अशी याचे बांधकाम आहे. पुतळा आणि खाली चौथरा याला ७०,००० टन सिमेंट लागले आहे.

स्प्रिंग टेंपल बुद्ध

स्थान : चीनमधील हेनान प्रांतातील लूसान.
उंची : चौथरा - २५ मीटर (८२ फूट); बुद्धाचा पुतळा - १२८ मीटर (४२० फूट). एकूण उंची - १५३ मीटर.
उभारणी : इ.स. २००२.

उशिकू दायबुत्सू

स्थान  : जपानमधील उशिकू गावी.
उंची : चौथरा - १० मीटर; बुद्धाचा पुतळा ११० मीटर; एकूण उंची - १२० मीटर'
उभारणी - इ.स. १९९५.

स्टॅच्यू ऑफ लिबर्टी

स्थान : अमेरिकेतील न्यूयाॅर्क शहर
उंची : ९३ मीटर
उभारणी : इ.स. १८८६.

द मदरलँड काॅल्स (एका महिलेचा पुतळा)

स्थान : व्हाॅल्गोग्रॅड (रशिया)
उंची : ८५ मीटर (२७९ फूट)