जगातील उंच पुतळे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जगातील सर्वात अधिक उंच पुतळ्यांची यादी :

स्टॅच्यू ऑफ युनिटी[संपादन]

वल्लभभाई पटेल यांचा पुतळा हा भारताच्या गुजराथ राज्यात राजपिपळा गावाजवळ नर्मदा धरणाच्या शेजारी आहे. इ.स.२०१८ च्या ऑक्टोबरमध्ये याचे उद्घाटन झाले.

पुतळ्याची उंची १८२ मीटर (५९७ फूट) आहे. ६.५ रिश्टर भूकंपाच्या धक्क्यातही हा सुरक्षित राहील इतका हा मजबूत आहे. हा ताशी १८० किलोमीटर वाऱ्या वेगातही टिकेल, अशी याचे बांधकाम आहे. पुतळा आणि खाली चौथरा याला ७०,००० टन सिमेंट लागले आहे.

स्प्रिंग टेंपल बुद्ध[संपादन]

स्थान : चीनमधील हेनान प्रांतातील लूसान.
उंची : चौथरा - २५ मीटर (८२ फूट); बुद्धाचा पुतळा - १२८ मीटर (४२० फूट). एकूण उंची - १५३ मीटर.
उभारणी : इ.स. २००२.

उशिकू दायबुत्सू[संपादन]

स्थान  : जपानमधील उशिकू गावी.
उंची : चौथरा - १० मीटर; बुद्धाचा पुतळा ११० मीटर; एकूण उंची - १२० मीटर'
उभारणी - इ.स. १९९५.

स्टॅच्यू ऑफ लिबर्टी[संपादन]

स्थान : अमेरिकेतील न्यूयाॅर्क शहर
उंची : ९३ मीटर
उभारणी : इ.स. १८८६.

द मदरलॅंड काॅल्स (एका महिलेचा पुतळा)[संपादन]

स्थान : व्हाॅल्गोग्रॅड (रशिया)
उंची : ८५ मीटर (२७९ फूट)