"माया परांजपे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: माया परांजपे (जन्म : इ.स. १९४५; मृत्यू : २३ सप्टेंबर २०१९) य एक स्त्री... |
|||
ओळ १३: | ओळ १३: | ||
* सौंदर्ययात्री (आत्मचरित्र) |
* सौंदर्ययात्री (आत्मचरित्र) |
||
* सौंदर्यसाधना (१९८२; हे पुस्तक वाचून अनेक मराठी स्रियांचा बुजरेपणा कमी झाला) |
* सौंदर्यसाधना (१९८२; हे पुस्तक वाचून अनेक मराठी स्रियांचा बुजरेपणा कमी झाला) |
||
{{DEFAULTSORT:परांजपे,माया}} |
|||
[[वर्ग:मराठी उद्योजक]] |
|||
[[वर्गं:मराठी लेखक]] |
|||
[[वर्ग:इ.स. १९४५ मधील जन्म]] |
|||
[[वर्ग:इ.स. २०१९ मधील मृत्यू]] |
२१:५६, ७ ऑक्टोबर २०१९ ची आवृत्ती
माया परांजपे (जन्म : इ.स. १९४५; मृत्यू : २३ सप्टेंबर २०१९) य एक स्त्री सौदर्यप्रसाधन कलेच्या तज्ज्ञ होत्या. आयुष्यभर त्या सौंदर्य प्रसाधनकलेतील ज्ञानदानाचे काम करीत होत्या आणि त्याचवेळी या क्षेत्रातील बदलती तंत्रे आत्मसात करत होत्या.
माया परांजपे यांनी १९६४ साली पुणे विद्यापीठातून रसायनशास्त्राची पदवी मिळवली. मग वर्षभर स्वित्झर्लंडच्या जीनिव्हा विद्यापीठात प्रयोगशाळा साहाय्यक म्हणून काम केले. तेथेच जैव-रसायनशास्त्राबरोबरच ‘ब्यूटी कल्चर’चाही अभ्यास करून त्या मुंबईत परतल्या आणि ‘ओव्हेशन इंटरनॅशनल’ या सौंदर्य प्रसाधनांची निर्मिती करणाऱ्या कंपनीत सल्लागार म्हणून रुजू झाल्या. याच कंपनीने त्यांना लंडनला ‘ब्यूटी थेरपी’चा अभ्यास करण्यासाठी पाठवले होते. एकोसशे सत्तरच्या दशकभरात त्यांनी सौंदर्य प्रसाधन, केशभूषा या विषयांतील विविध शास्त्रीय अभ्यासक्रम पूर्ण केले आणि १९७६ साली ‘ब्रिटिश असोसिएशन ऑफ ब्यूटी थेरपी अॅन्ड कॉस्मेटोलॉजी’ या संस्थेचे सभासदत्व मिळवले.
१९६८ साली माया परांजपे यांनी मुंबईत ‘ब्युटिक’ नावाचे 'ब्यूटी पार्लर' सुरू केले. ते नीट चालू लागल्यावर त्यांनी मुंबईत आणखी दोन व पुण्यात एक अशा सौंदर्य प्रसाधनालयाच्या एकूण चार शाखा यशस्वीरीत्या चालवल्या.
माया परांजपे ह्यांनी १९७६पासून सौंदर्य प्रसाधनांचे उत्पादन, आणि त्यावेळी प्रसाधनकलेचे अभ्यासक्रम शिकविणाऱ्या संस्था सुरू केल्या.
माया परांजपे यांचे लेखन
- वृत्तपत्रीय लेखन
- तुम्हाला ब्युटी पार्लर चालवायचंय? (पुस्तक)
- लेटेस्ट हेअरस्टाइल्स (पुस्तक)
- सौंदर्ययात्री (आत्मचरित्र)
- सौंदर्यसाधना (१९८२; हे पुस्तक वाचून अनेक मराठी स्रियांचा बुजरेपणा कमी झाला)