माया परांजपे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

माया परांजपे (१९४५ - २३ सप्टेंबर, २०१९) य एक स्त्री सौदर्यप्रसाधन कलेच्या तज्ज्ञ होत्या.

परांजपे यांनी १९६४ साली पुणे विद्यापीठातून रसायनशास्त्राची पदवी मिळवली. त्यानंतर त्यांनी एक वर्ष स्वित्झर्लंडच्या जीनिव्हा विद्यापीठात प्रयोगशाळा साहाय्यक म्हणून काम केले. तेथेच जैव-रसायनशास्त्राबरोबरच ‘ब्यूटी कल्चर’चाही अभ्यास करून त्या मुंबईस परतल्या आणि ओव्हेशन इंटरनॅशनल या सौंदर्य प्रसाधनांची निर्मिती करणाऱ्या कंपनीत सल्लागार म्हणून रुजू झाल्या. ओव्हेशनने त्यांना लंडनला ‘ब्यूटी थेरपी’चा अभ्यास करण्यासाठी पाठवले. १९७०च्या दशकात त्यांनी सौंदर्य प्रसाधन, केशभूषा या विषयांतील विविध शास्त्रीय अभ्यासक्रम पूर्ण केले आणि १९७६ साली ब्रिटिश असोसिएशन ऑफ ब्यूटी थेरपी अँड कॉस्मेटोलॉजी या संस्थेचे सभासदत्व मिळवले.

१९६८ साली परांजपे यांनी मुंबईत ब्युटिक नावाचे सौंदर्य प्रसाधन गृह सुरू केले. ते नीट चालू लागल्यावर त्यांनी मुंबईत आणखी दोन व पुण्यात एक अशा सौंदर्य प्रसाधनालयाच्या एकूण चार शाखा चालवल्या.

परांजपे ह्यांनी १९७६पासून सौंदर्य प्रसाधनांचे उत्पादन, आणि त्यावेळी प्रसाधनकलेचे अभ्यासक्रम शिकविणाऱ्या संस्था सुरू केल्या.

लेखन[संपादन]

  • वृत्तपत्रीय लेखन
  • तुम्हाला ब्युटी पार्लर चालवायचंय? (पुस्तक)
  • लेटेस्ट हेअरस्टाइल्स (पुस्तक)
  • सौंदर्ययात्री (आत्मचरित्र)
  • सौंदर्यसाधना १९८२