"शंतनू अभ्यंकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: डाॅ. शंतनू अभ्यंकर हे सातारा जिल्ह्यातील एक वैद्यकीय व्यावसायिक... |
(काही फरक नाही)
|
२२:४८, २९ ऑगस्ट २०१९ ची आवृत्ती
डाॅ. शंतनू अभ्यंकर हे सातारा जिल्ह्यातील एक वैद्यकीय व्यावसायिक असून मराठी लेखक आहेत. दैनिक दिव्य मराठीच्या महिला पुरवणीत, मधुरिमात, ते 'अर्थ स्त्री आरोग्याचा' हे सदर लिहीत. त्यांचा 'पाळी मिळी गुपचिळी' हा लेख त्यांनी फेसबुकवर टाकला. त्यांच्या एका विद्यार्थ्याने तो व्हाॅट्सॲपवरही प्रसिद्ध केला. महाराष्ट्रातील अनेक वर्तमानपत्रांनी या लेखाची दखल घेतली. जिल्हा वृत्तपत्रांनी तर संपूर्ण लेख जशाच्या तसा छापला. लेखाला स्त्रियांचा अमाप प्रतिसाद लाभला. डाॅ. शंतनू अभ्यंकरांना महिनाभरात चारपाचशे फोन आले. त्यांतले ९० टक्के स्त्रियांचे होते. काही डाॅक्टरांनी या लेखाचे फ्लेक्स करून आपल्या दवाखान्यात लावले. आणि मग डाॅक्टर असेच लिहीत गेले. पुढे त्यांच्या लेखांची पुस्तके झाली.
डाॅ. शंतनू अभ्यंकरांनी लिहिलेली पुस्तके
- जादुई वास्तव (भावानुवादित, मूळ इंग्रजी 'द मॅजिक ऑफ रिॲलिटी', लेखक : रिचर्ड डाॅकिन्स)
- पाळी मिळी गुप चिळी (स्त्री आरोग्यविषयक)
- फादर टेरेसा आणि इतर वल्ली : एका डाॅक्टरला भेटलेली खुमासदार माणसं
- संभोग का सुखाचा? : अर्थात मैथुन मौजेची उत्क्रांती (अनुवादित, मूळ इंग्रजी 'व्हाय इज सेक्स फन', लेखक : जॅरेड डायमंड)