"पिंगुळी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: पिंगुळी हे महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कुडाळ त... |
(काही फरक नाही)
|
१५:३५, २५ ऑगस्ट २०१९ ची आवृत्ती
पिंगुळी हे महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कुडाळ तालुक्यातले एक गाव आहे. गाव समुद्र सपाटीपासून २६ मीटर उंचीवर आहे. पिंगुळी हे कुडाळपासून सात किलोमीटरवर आहे.
या गावात संत रावूळ महाराजांचा जन्म झाला होता. त्यांच्या समाधीवर बांधलेले एक भव्य मंदिर या गावात आहे. त्यांच्या नावाचा संत रावूळ ट्रस्ट नावाचा एक न्यासही आहे.
पिंगुळीच्या लोककला
पिंगुळीमध्ये आढळणाऱ्या 'चित्रकथी', 'कळसूत्र', 'छायाबाहुल्या', 'गोंधळ', 'तमाशा(राधा)', 'पांगुळ', 'पोवाडा', 'पिंगळी(जोशी)' आणि 'गीता' या नऊ लोककलांना 'पिंगुळी लोकपरंपरेतील कला' असे नाव आहे.
यांपैकी 'चित्रकथी' ही पिंगुळी परंपरेतली प्रयोगात्म कला म्हणून ओळखली जाते. ही लोककला ठाकर जमातीतील लोककलाकार परंपरेने सादर करीत आले आहेत. पिंगुळी परंपरेतील नामशेष होत चाललेल्या या 'चित्रकथी'वर डाॅ. महेश केळुसकर यांनी 'चित्रकथी' नावाचे संशोधनात्मक पुस्तक लिहिले आहे. ठाण्याच्या अनघा प्रकाशनाने ते प्रसिद्ध केले आहे.
[[वर्ग:सिंधुदुर्ग जिल्ह्यातली गावे)