Jump to content

"माधव केशव काटदरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: माधव केशव काटदरे (जन्म : ३ डिसेंबर १८९२; मृत्यू ३ सप्टेंबर १९५८) ऊर...
(काही फरक नाही)

२२:३५, २७ जुलै २०१९ ची आवृत्ती

माधव केशव काटदरे (जन्म : ३ डिसेंबर १८९२; मृत्यू ३ सप्टेंबर १९५८) ऊर्फ कवी माधव हे एक मराठी निसर्गकवी होते. ते मूळचे कोकणातील असले तरी त्यांचे बरेचसे आयुष्य आबकारी खात्यातील नोकरीमुळे मुंबईत गेले.

माधव काटदरे यांनी निसर्गकवितांशिवाय काही ऐतिहासिक कविताही लिहिल्या. छत्रपती शिवाजीमहाराज, शाहूमहाराज, सवाई माधवराव, मस्तानी असे त्यांच्या कवितांचे विषय होते. याशिवाय काटदऱ्यांनी शिशुगीते व, विनोदी कविताही लिहिल्या.

'हिरवे तळकोकण' ही काटदऱ्यांची प्रसिद्ध कविता. हिच्यामुळेच ते जनमानसांत ओळखले जातात.

काटदऱ्यांनी गोविंदाग्रज, ना वा. टिळक, बालकवी, कवी विनायक आदी मराठी कवींवर कविता लिहिल्या आहेत.

‘पानपतचा सूड’, ‘तारापूरचा रणसंग्राम’, ‘जिवबादादा बक्षी’ या त्यांच्या काही ऐतिहासिक कविता.

काटदऱ्यांनी रवींद्रनाथ टागोर यांच्या काही कवितांचीही अतिशय प्रासादिक भाषांतरेही केली आहेत.

ज्या कवितेमुळे माधव काटदरे यांना अमाप प्रसिद्धी मिळाली ती 'हिरवे तळकोकण' ही कविता :

सहय़ाद्रीच्या तळी शोभिते हिरवे तळकोंकण,,
राष्ट्रदेविचे निसर्गनिर्मित केवळ नंदनवन !

पूर्ण कविता [१]] येथे आहे.

माधव केशव काटदरे यांचे कवितासंग्रह

  • गीतमाधव (१९४२)
  • ध्रुवावरील फुले (१९१५)
  • फेकलेली फुले (१९२१)
  • माधवांची कविता (१९३५)